वीवो ने याच महिन्यात इंडियन मार्केट मध्ये आपला ‘वी’ शेप नॉच वाला स्मार्टफोन वी11 प्रो लॉन्च केला होता. या फोनच्या लॉन्च सोबत कंपनी ने माहिती दिली होती कि वीवो या सीरीज मध्ये अजून एक वर्जन वी11 नावाने घेऊन येणार आहे. त्यानुसार आज वीवो ने वी11 स्मार्टफोन देशात लॉन्च केला आहे. हा फोन पण ‘वी’ शेप वाल्या नॉच डिस्प्ले सह लॉन्च झाला आहे ज्याला कंपनी ने हेलो नॉच नाव दिले आहे. वीवो वी11 22,990 रुपयांमध्ये बाजारात आला आहे जो आज पासूनच आॅफलाईन रिटेल स्टोर्स सेल साठी उपलब्ध झाला आहे.
वीवो वी11 लुक व डिजाईन मध्ये आपल्या आधीच्या वर्जन वी11 प्रो सारखा आहे. हा फोन 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या हेलो नॉच सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2280 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ सुपर एमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन फनटच ओएस सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर झाला आहे. त्यासोबत हा मीडियाटेक पी60 चिपसेट वर चालतो.
कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम दिला आहे. वीवो वी11 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी11 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल . फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी हा फोन 25-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
वीवो वी11 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी वी11 मध्ये 3,315 एमएएच ची बॅटरी देण्यात अली आहे. वीवो वी सीरीज च्या हा लेटेस्ट स्मार्टफोन 22,990 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सोबतच आॅफलाईन रिटेल स्टोर्स वरून पण विकत घेता येईल.















