Home बातम्या Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत

Vivo V20 Pro 5G मॉडेल डिसेंबर मध्ये भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या किंमत

गेल्या महिन्यात Vivo ने भारतात V20 आणि V20 SE मॉडेल भारतात सादर केला होता. त्याचबरोबर कंपनीच्या Vivo V20 Pro 5G मॉडेलची पण चर्चा होती लेकिन तेव्हा हा लॉन्च केला गेला नाही आणि नंतर बातमी आली आहे कि हा फोन नोव्हेंबर मध्ये भारतात लॉन्च केला जाईल. परंतु 91 मोबाईल्सला आज या फोन संबंधित काही खास माहिती मिळाली आहे. हा फोन डिसेंबर मध्ये लान्च होईल तसेच याची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

आम्हाला हि बातमी इंडस्ट्रीच्या अश्या सोर्सकडून मिळाली आहे ज्याने Vivo बद्दल आधी दिलेली माहिती खरी ठरली आहे. त्यांनी आम्हाला सांगितले कि हा फोन मिड डिसेंबरच्या आधी भारतात लॉन्च होईल आणि यावेळी प्राइस खूप कॉम्पेटेटिव असेल. कंपनी वनप्लस नॉर्डच्या टक्कर मध्ये हा सादर करणार आहे आणि याची किंमत नॉर्डच्या मोठ्या वेरियंटच्या आसपास असेल. Vivo V20 Pro 5G वेरियंट भारतात येईल तसेच याचा कॅमेरा पण खूप खास असेल.

हे देखील वाचा : Vivo Y11 आणि Vivo Y50 झाले स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo V20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन

वीवो वी20 प्रो 5जी बद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीने आधी बाहेर लॉन्च केला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत. फोन मध्ये 6.44-इंचाची FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये तुम्हाला HDR10 सपोर्ट मिळेल आणि हा डुअल पंच होल सह येतो.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo S7e 5G, जाणून घ्या याची वैशिष्टये

कंपनीने हा Qualcomm Snapdragon 765G चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ची स्टोरेज मिळते. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. हा फोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो जी Funtouch OS 11 आधारित आहे. फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळेल जी 33W fast-charging ला सपोर्ट करते.

वीवो वी20 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन कॅमेरा 64MP चा आहे आणि कंपनीने Samsung ISOCELL GW1 सेंसरचा वापर केला आहे. तसेच 8MP चा ultra-wide सेंसर आणि 2MP मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 44MP + 8MP चा फ्रंट शूटर मिळतो. कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, व्यतिरिक्त डुअल बॅंड Wi-Fi, ब्लूटूथ आणि जीपीएस आणि USB Type-C port मिळेल.