8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo S7e 5G, जाणून घ्या याची वैशिष्टये

Vivo ने आपल्या S-सरीरीज मध्ये नवीन फोन S7e 5G चीन मध्ये लॉन्च केला आहे. कंपनीने फोनच्या किंमतीच्या आधी फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. याच्या किंमतीची घोषणा 11 नोव्हेंबरला केली जाईल, जो चीन मध्ये सिंगल्स डे म्हणून साजरा केला जातो. वीवो एस7ई 5जी तीन रंगात येतो, ज्यात मिरर ब्लॅक, फॅंटम ब्लू आणि सिल्वर मूनचा समावेश आहे.

5G सह असेल किंमत कमी

आशा आहे कि Vivo S7e 5G सेगमेंट मध्ये एंट्री लेवल फोन असू शकतो. तसेच डिवाइसची किंमत अलीकडेच लॉन्च झालेल्या वनप्लस एन10 च्या आसपास असेल. OnePlus नंतर सर्व कंपन्या प्रयत्न करत आहेत कि त्या स्वस्त 5जी फोन बनवून युजर्सना आपल्याकडे आकर्षित करतील.

हे देखील वाचा : 48MP आणि 128जीबी स्टोरेज सह भारतात आला Vivo V20 SE, Xiaomi-Realme ला देईल आव्हान

स्पेसिफिकेशन्स

फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता, Vivo S7e 5G मध्ये 20: 9 आस्पेक्ट रेशियो, 90.1 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि 408 पीपीआई पिक्सल डेंसिटी सह 6.44-इंच फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 720 ऑक्टा-कोर चिपसेट आहे जो 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह येतो.

हे देखील वाचा : पुन्हा एकदा कमी झाली लो बजेट Vivo Y91i ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस

फोटोग्राफी बद्दल बोलायचे झाले तर Vivo S7e 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात एफ/1.89 लेंस सह 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.2 अपर्चर सह 8-मेगापिक्सलची सुपर वाइड-अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2-मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसचा समावेश आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला वीवो एस7ई 5जी मध्ये एफ/2.0 अपर्चर सह 32-मेगापिक्सल कॅमेरा आहे.

Vivo S7e 5G मध्ये पावर बॅकअपसाठी 4,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येते. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट, 5जी एसए / एनएसए, ब्लूटूथ 5 आणि 3.5 एमएम ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here