Vivo ने Y-सरीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. या फोन्सची नावे Vivo Y11 आणि Y50 आहे. वीवो वाय11 कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये बजेट-सीरीज मध्ये सादर केला होता. तर वीवो वाय50 कंपनीने यावर्षी जून मध्ये मिड-रेंज सेगमेंट मध्ये सादर केला होता. या दोन्ही फोन्स पैकी Vivo Y50 च्या किंमतीत सप्टेंबर मध्ये कपात करण्यात आली होती. Vivo Y11 ची किंमत कंपनीने पहिल्यांदा कमी केली आहे. हि बातमी सर्वप्रथम Mahesh Telecom द्वारे शेअर करण्यात आली होती.
Vivo Y11 आणि Vivo Y50 ची नवीन प्राइस
Vivo Y11 फक्त एकाच वेरिएंट 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज मध्ये येतो. आता फोनची किंमत कमी करून 9,490 रुपये करण्यात आली आहे. हि किंमत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन मध्ये पण अपडेट करण्यात आली आहे.
Vivo Y50 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात पण करण्यात आली होती. आता फोनच्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्ही हा (8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज) 16,490 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. वीवो वाय50 पण फ्लिपकार्ट आणि अमेझॉन दोन्ही ऑनलाइन स्टोर वर नवीन किंमतीसह लिस्टेड आहे.
Vivo Y11 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y11 कंपनीने मोठ्या स्क्रीन सह सादर केला आहे. या फोन मध्ये तुम्हाला 6.35-इंचाची HD+ आईपीएस एलसीडी स्क्रीन मिळेल. फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉचचा वापर केला गेला आहे. हा फोन स्नॅपड्रॅगॉन 439 वर चालतो आणि यात 2.1 गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 3 GB रॅम आणि 32 GB ची इंटरनल स्टोरेज आहे. फोन मध्ये माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट आहे.
Vivo Y11 कंपनीने अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम 9 पाई सह सादर केला आहे आणि यात तुम्हाला फनटच ओएस ची लेयरिंग मिळेल. राहिला प्रश्न कॅमेऱ्याचा तर तो पण कमजोर नाही. या फोन मध्ये 13 + 2 एमपी चा डुअल कॅमेरा सेटअप मिळेल. त्याचबरोबर सेल्फी साठी 8 एमपी चा फ्रंट कॅमेरा पण आहे जो वॉटर ड्रॉप नॉच मध्ये देण्यात आला आहे.
डेटा व कनेक्टिविटी साठी या फोन मध्ये डुअल सिम सोबत 4जी वोएलटीई सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच तुम्हाला ब्लूटूथ, वाईफाई आणि माइक्रो यूएसबी पोर्ट मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी आहे. पण फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली नाही.
Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.
















