गेल्या महिन्यात Vivo ने भारतात V20 आणि V20 SE मॉडेल भारतात सादर केला होता. त्याचबरोबर कंपनीच्या Vivo V20 Pro 5G मॉडेलची पण चर्चा सुरु होती पण त्यावेळी हा हँडसेट लॉन्च केला नाही. नंतर कंपनीने माहिती दिली होती कि वीवो वी 20 प्रो लवकरच भारतीय मार्केट मध्ये सादर केला जाईल. अलीकडेच 91मोबाईल्सने बातमी दिली होती कि या फोनची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास असेल. आता आम्हाला ऑफलाइन सोर्सकडून डिवाइसच्या किंमत आणि प्री-बुकिंग ऑफर्सची माहिती मिळाली आहे.
Vivo V20 Pro 5G ची किंमत
आमच्या सोर्सनुसार Vivo V20 Pro 5G भारतात 29,990 (MOP) वर सादर केला जाईल. या किंमतीनुसार हा फोन इंडियन मार्केट मध्ये OnePlus Nord च्या हाय-एन्ड मॉडेलला आव्हान देईल, ज्याची किंमत 29,999 रुपये आहे.
प्री-बुकिंग ऑफर्स
Vivo V20 Pro 5G ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. आम्हाला मिळालेल्या पोस्टर मध्ये फोनच्या प्री-बुकिंग बॅंक ऑफर्सची माहिती समोर आली आहे. या ऑफर्स नुसार ICICI बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदावर 10 टक्के व इझी ईएमआय ऑप्शन सह जियोकडून काही लाभ मिळतील.
हे देखील वाचा :
Vivo V20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन
वीवो वी20 प्रो 5जी बद्दल बोलायचे झाले तर हा कंपनीने आधी बाहेर लॉन्च केला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन उपलब्ध आहेत. फोन मध्ये 6.44-इंचाची FHD+ स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने AMOLED डिस्प्ले पॅनलचा वापर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. फोन मध्ये तुम्हाला HDR10 सपोर्ट मिळेल आणि हा डुअल पंच होल सह येतो.
कंपनीने हा Qualcomm Snapdragon 765G चिपसेट वर सादर केला आहे आणि फोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ची स्टोरेज मिळते. फोन मध्ये एक्सपांडेबल मेमरी सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्डचा वापर करू शकता. हा फोन Android 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो जी Funtouch OS 11 आधारित आहे. फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळेल जी 33W fast-charging ला सपोर्ट करते.
वीवो वी20 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मेन कॅमेरा 64MP चा आहे आणि कंपनीने Samsung ISOCELL GW1 सेंसरचा वापर केला आहे. तसेच 8MP चा ultra-wide सेंसर आणि 2MP मोनोक्रोम सेंसर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 44MP + 8MP चा फ्रंट शूटर मिळतो. कनेक्टिविटीसाठी 5G, 4G LTE, व्यतिरिक्त डुअल बॅंड Wi-Fi, ब्लूटूथ आणि जीपीएस आणि USB Type-C port मिळेल.
















