91मोबाइल्सनं काही दिवसांपूर्वी एक्सक्लूसिवली माहिती दिली होती की चीनी कंपनी विवो आपला नवीन मोबाईल फोन Vivo V25 Pro 5G स्मार्टफोन 17 ऑगस्टला भारतात लाँच करणार आहे. आता कंपनीनं देखील अधिकृतपणे 17 August च्या लाँच डेटवर शिक्कामोर्तब केला आहे. लीकनुसार, Vivo V25 सीरीजचे दोन स्मार्टफोन Vivo V25 आणि Vivo V25 Pro लाँच होतील. कंपनीनं विवो वी 25 प्रो स्मार्टफोनचे मुख्य स्पेसिफिकेशन्स देखील टीज केले आहेत. ज्यानुसार Vivo Smartphone कलर चेंजिंग बॅक पॅनल आणि 3डी कर्व्ड स्क्रीनसह येतील. स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह 64 मेगापिक्सलच्या मेन कॅमेऱ्यासह येईल. इतकंच नव्हे तर गेल्या आठवड्यात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर विवोच्या अपकमिंग फोनसाठी मायक्रोसाइट देखील लाइव्ह झाली होती. चला जाणून घेऊया या फोनमध्ये कोणते फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स असतील.
Vivo V25 Pro लीक स्पेसिफिकेशन्स
लिक्सनुसार, विवो वी 25 प्रो मध्ये फुल एचडी + रिजॉल्यूशन आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा कर्व्ड AMOLED पॅनल दिला जाईल. तसेच अलीकडेच लीक झालेल्या गीकबेंच लिस्टिंगनुसार, फोन मीडियाटेक डिमेन्सिटी 1300 SoC सह येईल जो V23 प्रो मधील डिमेन्सिटी 1200 पेक्षा चांगला असेल. तसेच हँडसेट 12GB रॅम आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह दोन व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा: VIVO नं कायमस्वरूपी कमी केली दोन स्मार्टफोन्सची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत
स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे असतील. यात OIS आणि EIS सपोर्ट असलेला 64MP चा प्रायमरी सेन्सर आणि दोन auxiliary सेन्सर मिळतो. फोनमध्ये एक 32MP चा स्नॅपर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी दिला जाईल.
विवो वी25 प्रो मध्ये 66W फास्ट चार्जिंगसह एक मोठी 4,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, एआय सेल्फी, सुपर नाइट मोड, कलर-चेंजिंग एजी ग्लास बॅक आणि अँड्रॉइड 12 आउट ऑफ द बॉक्ससह फनटचओएस सपोर्ट मिळेल. हे देखील वाचा: फक्त 8,000 रुपयांमध्ये येतोय Vivo Y02s, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
भारतात विवो वी25 प्रो ची किंमत
विवो वी25 प्रो आधीच्या विवो स्मार्टफोनप्रमाणे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांतून सादर केला जाईल. तसे लीक स्पेसिफिकेशन्स असं वाटत आहे की, V25 प्रो कंपनीद्वारे सादर करण्यात आलेल्या V23 प्रो च्या तुलनेत थोडा चांगला असेल. तसेच, फोन दोन memory ऑप्शनमध्ये सादर केला जाणार असल्याची अफवा आहे आणि याची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
