फक्त 8,000 रुपयांमध्ये येतोय Vivo Y02s, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मोबाईल निर्माता Vivo लवकरच कमी किंमतीत शानदार स्मार्टफोन सादर करण्याची तयारी करत आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या Y-सीरीजमध्ये सादर होईल, ज्याचे नाव Vivo Y02s असेल. सर्वप्रथम हा फोन जागतिक बाजारात येईल आणि नंतर याची एंट्री भारतीय बाजारात होईल. कंपनीनं मात्र स्मार्टफोनच्या लाँच डेटचा खुलासा केला नाही परंतु कंपनीच्या ग्लोबल वेबसाईटवर हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून फोनच्या फीचर्स आणि खास डिजाइनची माहिती मिळाली आहे. समोर आलेल्या फोनमध्ये 6.51 इंचाचा मोठा डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच डिजाइनसह दिसत आहे. तसेच फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देखील मिळणार आहे. विशेष म्हणजे कंपनी हा फोन सुमारे 8,000 रुपयांमध्ये सादर करू शकते. चला जाणून घेऊया आगामी Vivo Y02s स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.

Vivo Y02s चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y02s फोन लाँच पूर्वीच चुकून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला होता, अशी माहिती मायस्मार्ट प्राईसनं दिली आहे. ही लिस्टिंग नंतर विवोच्या वेबसाईटवरून काढून टाकण्यात आली परंतु त्यामुळे फोनचे फीचर्स समोर आले आहेत. लिस्टिंगमध्ये Vivo Y02s स्मार्टफोन फ्लोराइट ब्लॅक आणि व्हायब्रन्ट ब्लू अशा दोन रंगांमध्ये लाँच केला जाईल, हे समजलं आहे. तसेच फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेटपासून बनवण्यात येईल.

फोनचा डिस्प्ले पाहता Y02s मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळेल. ज्यात 60Hz रिफ्रेश रेट मिळेल. डिस्प्लेच्या वॉटर-ड्रॉप नॉच डिजाइनमध्ये सेल्फी कॅमेरा असेल. हा कॅमेरा 5MP चा सेन्सर असेल. तर रियर कॅमेरा मॉड्यूलमध्ये दोन मोठे वर्तुळाकार कटआउट दिसत आहेत, ज्यात एक मध्ये एलईडी फ्लॅश असेल आणि एकात 8MP चा सिंगल प्रायमरी कॅमेरा सेन्सर मिळेल.

लिस्टिंगमधून फोनच्या 32GB इंटरनल स्टोरेज आणि 3GB रॅमची माहिती मिळाली आहे. इतर कोणताही स्टोरेज व्हेरिएंटची माहिती मिळाली नाही. तसेच फोनमध्ये व्हर्चुअल रॅम फिचर असेल की नाही ते देखील आतातरी सांगता येणार नाही. प्रोसेसर पाहता यात MediaTek Helio P35 SoC दिला जाईल. जो एक एंट्री-लेव्हल चिपसेट आहे ज्याचा वापर भारतात 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या स्मार्टफोनमध्ये सामान्यतः केला जातो. म्हणजे हा डिवाइस भारतात या किंमतीत येऊ शकतो. तसेच Y02s मध्ये 5000 एमएएच ची बॅटरी दिली जाईल. कंपनीनं दावा केला आहे की फोन 18 तासांपर्यंत ऑनलाइन एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग, 7 तास गेमिंग किंवा 22 तास म्यूजिक प्लेबॅक देईल. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्टच्या माध्यमातून 10W चार्जिंगला सपोर्ट मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here