Vivo ने इंडोनेशियामध्ये V40 सीरीजच्या Vivo V40 Lite मोबाईलला 4G आणि 5G तंत्रज्ञानासह सादर करण्यात आले आहे. तुम्हाला सांगतो की याआधी 5G मॉडेल जागतिक स्तरावर सादर केलेले आहे, परंतु त्याचा लूक नवीनतम मॉडेलपेक्षा वेगळा आहे. तर आता एका नवीन डिझाईनसह त्याला इंडोनेशियामध्ये एन्ट्री मिळाली आहे. चला , पुढे तुम्हाला Vivo V40 Lite 4G आणि Vivo V40 Lite 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन बद्दल सविस्तर माहिती देत आहोत.
Vivo V40 Lite 4G आणि 5G चे डिझाईन
Vivo V40 Lite 4G आणि 5G च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास तो तीन गोलाकार कटआऊट्स असलेल्या कॅमेरा मॉड्यूलसह येतो. यात दोन कॅमेरा सेन्सर आणि Vivo ची सिग्नेचर ऑरा लाईटिंग दिली आहे. फोनच्या बॅक पॅनलवर सर्वात वरच्या कॅमेरा सेन्सरच्या बाजूला डुअल फ्लॅश देखील आहे. तर, उजव्या बाजूला पॉवर आणि व्हॉल्यूम बटणे आणि मागील बाजूस तळाशी ब्रँडिंग दिली गेली आहे.
Vivo V40 Lite 4G आणि 5G चे स्पेसिफिकेशन
डिस्प्ले: Vivo V40 Lite 4G आणि 5G मॉडेल्समध्ये 6.7 इंचाचा एएडी+ ॲमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. त्यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 2400 x 1080 चे पिक्सेल रिझोल्यूशन मिळत आहे. ज्याच्या मदतीने उत्तम स्क्रीन अनुभव घेता येतो.
स्टोरेज आणि रॅम: Vivo V40 Lite 4G आणि 5G व्हर्जनमध्ये 8 जीबी पर्यंत LPDDR4X रॅम दिली गेली आहे. दोन्ही 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ने सुसज्ज आहेत. इतकेच नाही तर एक्सटेन्डेड तंत्रज्ञानाच्या मदतीने रॅम 8 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
कॅमेरा: Vivo V40 Lite 5G मध्ये 50 मेगापिक्सेलचा सोनी आयएमएक्स882 मुख्य सेन्सर आहे. यामध्ये 8 मेगापिक्सेलचा 120 डिग्री अल्ट्रा-वाईड सेन्सर मिळत आहे. तर 4G मध्ये 50 मेगापिक्सेलच्या सोनी आयएमएक्स882 मुख्य सेन्सरसह 2 मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर लावला आहे. त्याचवेळी, दोन्ही फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: Vivo V40 Lite 4G आणि 5G या दोन्हींमध्ये 80 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000एमएएच ची बॅटरी दिली गेली आहे.
इतर: फोन मध्ये आयपी64 रेटिंग, एआय इरेजर, एआय एन्हान्समेंट, 300% ऑडिओ बूस्टरसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर, दोन मायक्रोफोन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे अनेक फिचर्स आहेत.
ऑपरेटिंग सिस्टम: हे स्मार्टफोन्स अँड्राईड 14 आधारित फनटचओएस 14 वर बेस्ड आहेत. यासोबत 3 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स आणि 2 ओएस अपग्रेड दिले जातील.
Vivo V40 Lite 4G आणि 5G ची किंमत (अपेक्षित)
- Vivo V40 Lite 4G च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेजची किंमत IDR 3,599,000 म्हणजेच सुमारे 19,800 रुपये आहे. तर, 8 जीबी + 256 जीबी मॉडेल IDR 3,699,000 म्हणजेच भारतीय दरानुसार 20,300 रुपयांचा आहे.
- 5G मॉडेलबद्दल बोलायचे झाले झाल्यास ते सिंगल स्टोरेज 8 जीबी +256 जीबी मध्ये IDR 4,299,000 म्हणजेच सुमारे 23,500 रुपयांमध्ये येत आहे.
- Vivo V40 Lite 5G व्हेरिएंट टायटॅनियम सिल्व्हर आणि कार्बन ब्लॅक अशा दोन रंगांमध्ये विकला जाईल.
- Vivo V40 Lite 4G मॉडेल टायटॅनियम सिल्व्हर, कार्बन ब्लॅक आणि पर्ल व्हायलेट अशा तीन रंगांमध्ये येतो.