हैलो नॉच आणि डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला वीवोचा नवीन वाय93, बघा किंमत आणि स्पेसिफिकेशन

गेल्या महिन्यात वीवो ने चीन मध्ये वाय 93 मॉडेल सादर केला होता. तर आता कंपनी ने हा फोन भारतात पण लॉन्च केला आहे. वीवो वाय93 ची किंमत 13,990 रुपये आहे आणि हा ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध झाला आहे. हा फोन कंपनीच्या वाय95 चा छोटा वर्जन आहे. काही गोष्टी सोडता याचे जवळपास सर्व स्पेसिफिकेशन सारखे आहेत. चांगली बाब अशी की कमी रेंज मध्ये येऊनही तुम्हाला हैलो नॉच ज्याला वॉटर ड्रॉप नॉच पण बोलले जाते मिळेल.

वीवो वाय93 चे स्पेसिफिकेशन
वीवो वाय93 मध्ये 6.22—इंचाची 1520 × 720 पिक्सल रेजल्यूशन वाली एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. कपंनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात तुम्हाला फूल व्यू डिस्प्ले मिळेल. अर्थात ऊत बेजाल दिसणार नाहीत. फोनचा स्क्रीन टू बॉडी रे​शियो 88.6 टक्के आहे. स्क्रीनच्या वर छोटीशी नॉच दिसेल ज्याला कंपनी ने हेलो नॉचचे नाव दिले आहे. नॉच वरच सेल्फी कॅमेरा आहे.

वीवो वाय95 क्वालकॉम चिपसेट वर चालतो तर हा फोन मीडियाटेक प्रोसेसर आधारित आहे. फोन मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर सादर केला गेला आहे आणि यात 2.0गीगाहट्र्ज का चा ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल.

भारतीय बाजरात हा फोन 4जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे. हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे.

वीवो वाय93 मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. फोन मध्ये 2जी, 3जी सोबत तुम्ही 4जी वोएलटीई चा वापर करता येईल. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल मध्ये 13एमपी + 2एमपी चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/2.2 अपर्चर आणि एफ/2.4 अपर्चर सह सादर केला आहे. तसेच सेल्फी साठी फ्रंट पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 8—मेगापिक्सल चा कॅमेरा आहे जो लो लाइट मध्ये पण चांगले फोटो घेतो.

वीवो वाय93 मध्ये 4,030 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही. फोन मध्ये माइक्रो यूएसबी पोर्ट 2.0 उपलब्ध आहे. हा फोन स्टारी ब्लॅक, नेब्युला पर्पल रंगात उपलब्ध आहे. सेल्स पॅक सोबत तुम्हाला यूएसबी केबल, सिम इजेक्टर, प्रोटेक्टिव फिल्म आणि प्रोटेक्टिव केस पण मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here