Vivo V40 SE 4G मोबाईल लवकर होऊ शकतो लाँच, ब्लूटूथ एसआयजी साईटवर झाला लिस्ट

विवोने गेल्या महिन्यात आपला Vivo V40 SE 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. तसेच, आता याच्या Vivo V40 SE 4G व्हेरिएंट सादर होण्याची बातमी समोर आली आहे. कारण हा डिव्हाईस सर्टिफिकेशन वेबसाईट ब्लूटूथ एससीजीवर स्पॉट करण्यात आला आहे. तसेच नवीन फोनचा मॉडेल नंबर Vivo Y100 4G आणि Vivo V30 Lite 4G सारखाच आहे. म्हणजे की याचे स्पेसिफिकेशन पण या दोन्ही फोनशी मिळते-जुळते असू शकतात. चला, पुढे लिस्टिंग माहिती सविस्तर जाणून घेऊया.

Vivo V40 SE 4G ब्लूटूथ एससीजी लिस्टिंग

  • विवोचा नवीन स्मार्टफोन सेर्टिफिकेशन साईट ब्लूटूथ SIG वर मॉडेल नंबर V2342 सह दिसला आहे.
  • तुम्ही खाली लिस्टिंग फोटोमध्ये फोनचे नाव Vivo V40 SE 4G पण पाहू शकता.
  • ब्लूटूथ एससीजी सर्टिफिकेशन प्लॅटफॉर्मनुसार Vivo V40 SE 4G मध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.0 ची सुविधा दिली जाऊ शकते.
  • आशा आहे की नवीन फोन Vivo V40 SE 4G मॉडेल नंबर समान असल्यामुळे Vivo Y100 4G आणि Vivo V30 Lite 4G चा रिब्रँड व्हर्जन असू शकतो.

Vivo Y100 4G चे स्पेसिफिकेशन

Vivo Y100 4G फोन या महिन्यात जागतिक बाजारात लाँच झाला आहे. ज्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

  • डिस्प्ले: Vivo Y100 4G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. यावर 2400 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1200 निट्स हाय ब्राईटनेस मिळते.
  • प्रोसेसर: फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 685 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 2.8Ghz पर्यंतच्या हाई क्लॉक स्पीड प्रदान करण्यामध्ये सक्षम आहे.
  • स्टोरेज: फोनला 8 जीबी रॅम, 8 जीबी वचुर्अल रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहे.
  • कॅमेरा: Vivo Y100 4G मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल इतर लेन्स लावली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: स्मार्टफोनमध्ये मोठ्या बॅकअपसाठी 5,000 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याला फास्ट चार्ज करण्यासाठी 80 वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • इतर: मोबाईलमध्ये इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेन्सर, पाणी आणि धूळीपासून वाचणारी IP54 रेटिंग, ड्युअल स्टेरियो स्पिकर, ड्युअल सिम, वायफाय, ब्लूटूथ सारखे ऑप्शन मिळतात.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here