कोरोना वायरसमुळे भारतात सुरु झालेल्या लॉकडाउनचा परिणाम भारती एयरटेल आणि वोडोफोन वर मोठया प्रमाणात दिसला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून समोर येत असलेले रिपोर्ट्स पाहता स्पष्ट दिसत आहे कि दोन्ही टेलीकॉम कंपन्यांच्या सब्सक्राइबर्सची संख्या सतत कमी होत आहे. अशीच स्थिती मे मध्ये पण होती, ज्यात दोन्ही कंपन्यांचे जवळपास 94 लाख सब्सक्राइबर्स कमी झाले होते. दुसरीकडे रिलायंस जियोच्या ग्राहकांची संख्या पुन्हा वाढली आहे.
Jio आणि BSNL ने मारली बाजी
ट्राईने प्रसिद्ध केलेल्या लेटेस्ट रिपोर्ट नुसार जियोने मे मध्ये 36.577 लाखांपेक्षा पण जास्त नवीन सब्सक्राइबर्स जोडले आहेत. जियोच नाही तर सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL च्या पण वायरलेस सब्सक्राइबर्सची संख्या वाढली आहे. बीएसएनएल सह 2 लाख सब्सक्राइबर्स जोडले गेले आहेत.
Airtel-Vodafone चे झाले नुकसान
लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका वोडा-आइडियाला बसला आहे. तीन महिन्यात कंपनीच्या एक कोटी 55 लाख 96 हजारांपेक्षा जास्त ग्राहकांनी सेवा सोडली आहे. याच काळात एयरटेलचे 1 कोटी 12 लाख 74 हजारांपेक्षा जास्त ग्राहक नेटवर्क सोडून गेले आहेत.
देशात कमी झाले वायरलेस मोबाईल यूजर्स
दूरसंचार क्षेत्र नियामक संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) च्या आकड्यांनुसार लॉकडाउन मध्ये टेलीकॉम सेक्टरला खूप नुकसान झाले आहे. मार्च ते मे मध्ये एकूण 1 कोटी 66 लाखांपेक्षा ग्राहक घटले आहेत. याचा अर्थ असा कि देशात मोबाईल सर्विस वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या शेवटी 116 कोटी 5 लाखांच्या आसपास ग्राहक मोबाईल वायरलेस सर्विसचा वापर करत होते, तर मे च्या शेवटी हि संख्या कमी होऊन 114 कोटी 39 लाख झाली आहे.
बिहार आणि केरळ मध्ये वाढले यूजर्स
ट्राईने देशाला 22 सर्कल्स मध्ये विभागले आहे. मे मध्ये 22 पैकी 20 सर्कल्स मध्ये ग्राहकांची संख्या घटली आहे. त्याउलट बिहार आणि केरळ सर्कल मध्ये ग्राहक संख्या वाढली आहे.
34.33% मार्केट शेयर सह टॉप वर जियो
ट्राई नुसार मे च्या शेवटपर्यंत 39 कोटी 27 लाखांच्या आसपास ग्राहक आणि 34.33% मार्केट शेयर सह जियो सर्वात पुढे आहे. एयरटेल कडे 31 कोटी 78 लाखांच्या आसपास आणि वोडा-आइडिया कडे जवळपास 30 कोटी 99 ग्राहक आहेत. एयरटेल कडे 27.78% आणि वोडा-आइडिया कडे 27.09% मार्केट शेयर आहे. सरकारी कंपनियां बीएसएनएल आणि एमटीएनएल 10.79 टक्के बाजारावर राज्य करत आहेत.