Vivo ने आपल्या ग्राहकांना भेट देत 2 पावरफुल स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. कंपनीने Vivo X50 आणि Vivo V19 स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. नवीन किंमतीत सध्या फोन ऑफलाइन स्टोर्सवर विकत घेता येईल. टेक वेबसाइट MySmartPrice ने आपल्या रिपोर्ट मध्ये हि माहिती दिली आहे. कंपनीच्या ऑफिशियल साइटवर दोन्ही फोन आपल्या जुन्या किंमतीत विक्री केले जात आहेत. रिपोर्टनुसार कंपनीने Vivo X50 ची किंमत 5,000 रुपये आणि Vivo V19 स्मार्टफोनची किंमत 3,000 रुपयांनी कमी केली आहे.
नवीन प्राइस
5000 रुपयांच्या कपातीनंतर वीवो एक्स50 29,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. प्राइस कटच्या आधी फोन 34,990 रुपयांमध्ये विकला जात होता. हि किंमत फोनच्या 8GB + 128GB वेरिएंटची आहे. तर 8GB RAM + 256GB वेरिएंट आता 32,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 8GB रॅम + 256GB वेरिएंट 37,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. दुसरीकडे Vivo V19 के 8GB RAM + 128GB वेरिएंट 21,990 रुपये आणि 8GB RAM + 256GB वेरिएंट 24,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा : Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा
Vivo X50 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo X50 मध्ये 6.56-इंचाचा फुल एचडी+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे जो पंच-होल कटआउट आणि 90Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच X50 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 730 प्रोसेसरची ताकद आहे. स्मार्टफोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा, 13-मेगापिक्सल पोर्ट्रेट कॅमेरा, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल कॅमेरा आणि 5-मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच यात 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी Vivo X50 मध्ये 4,200mAh ची बॅटरी 33W फास्ट-चार्जिंगला सपोर्टसह मिळते.
Vivo V19
Vivo V19 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.44 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 712 प्रोसेसर आणि अँड्रॉइड 10 वर बेस्ड FunTouch ऑपरेटिंग सिस्टम पण आहे. फोनच्या मागे 4 कॅमेरे देण्यात आले आहेत, ज्यात 48 मेगापिक्सलचा मेन सेंसर, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. तर, फ्रंटला 32 मेगापिक्सलचा मेन आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा : लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9
पावर बॅकअपसाठी Vivo V19 मध्ये 4,500mAh ची बॅटरी 33W वीवो फ्लॅश चार्ज 2.0 सह देण्यात आली आहे. तसेच फोन अँड्रॉइड 10-बेस्ड फनटच OS 10 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी डिवाइस मध्ये वाय-फाय 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5.0, 4G आणि टाइप-सी पोर्ट आहे.
वीवो एक्स50 व्हिडीओ
