Vivo येत्या काही आठवड्यांमध्ये आपल्या Y-सीरीजचा विस्तार करु शकते, या अंतर्गत नवीन स्मार्टफोन Vivo Y18t हा लाँच होण्याची अपेक्षा आहे. हा सर्वप्रथम आयएमईआय डेटाबेसवर दिसला होता. त्याचवेळी आता त्याला बीआयएस आणि टीयूव्ही सर्टिफिकेशन मध्ये पाहिले गेले आहे. त्यामुळे तो भारतात येण्याची शक्यता बळावली आहे. चला पुढे त्याच्या नवीनतम सूचीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Vivo Y18t बीआयएस सूची
- Vivo चा नवीन मोबाईल बीआयएस सर्टिफिकेशन मध्ये V2408 मॉडेल नंबर सह दिसला आहे.
- फोनला त्याच मॉडेल नंबरसह टीयूव्ही सर्टिफिकेशन वेबसाईटवर देखील स्थान मिळाले आहे.
- मोबाईलचे नाव Vivo Y18t याच्या आधी आयएमईआय सूचीमध्ये वर नमूद केलेल्या मॉडेल क्रमांकासोबतच समोर आले होते.
- आम्ही तुम्हाला सांगतो की, बीआयएस सर्टिफिकेशनमध्ये नवीन Vivo मोबाईलचे इतर कोणतेही तपशील नाहीत, परंतु याचे भारतात लवकरच लाँच होण्याचे हे संकेत आहेत.
Vivo Y18 चे स्पेसिफिकेशन
याची आठवण करून देतो की, Vivo ने मे 2024 मध्ये Vivo Y18 लाँच केले होते. ज्याबद्दल पुढे माहिती उपलब्ध आहे.
डिस्प्ले: Vivo Y18 मध्ये 6.56 इंचाचा एलसीडी HD+ डिस्प्ले आहे. त्यावर 1612×720 चे पिक्सेल रिझोल्यूशन, 269ppi पिक्सेल डेंसिटी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 840 निट्स ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो.
प्रोसेसर: डिव्हाईसमध्ये MediaTek Helio G85 हा चिपसेट मिळत आहे. यासोबत ग्राफिक्ससाठी माली G52 GPU बसवण्यात आला आहे.
स्टोरेज: हा मोबाईल 4GB LPDDR4X रॅम + 64GB आणि 128GB eMMC 5.1 स्टोरेजसह येतो. यात मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि 4GB एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट देखील मिळतो.
कॅमेरा: Vivo Y18 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि VGA सेन्सर एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याचवेळी यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
बॅटरी: Vivo Y18 फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. तिला चार्ज करण्यासाठी यात 15W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान मिळत आहे.
इतर: Vivo Y18 मध्ये साईड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, पाणी आणि धूळ यांच्यापासून संरक्षित करणारी IP54 रेटिंग, ड्युअल सिम 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि यूएसबी टाइप सी सपोर्ट मिळत आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: Vivo Y18 हा अँड्रॉईड 14 वर लाँच झाला असून, तो FunTouchOS 14 वर आधारित आहे.















