Exclusive: 6GB रॅम सह आला Vivo Y20 चा ताकदवान वेरिएंट, बघा या फोनची किंमत

Vivo Y20 यावर्षी ऑगस्ट मध्ये Y20i सह भारतात सादर केला गेला होता. लॉन्चच्या वेळी Vivo Y20 चा फक्त 4GB + 64GB मॉडेलचा आला होता. आता 91mobiles ला ऑफलाइन रिटेल सोर्स कडून माहिती मिळाली आहे कि कंपनी डिवाइसला अजून ताकदवान बनवत 6GB रॅम वेरिएंट पुढल्या आठवड्यात विक्रीसाठी सादर करेल. विक्रीच्या आधी Vivo Y20 6GB रॅम वेरिएंटच्या किंमतीचा खुलासा झाला आहे. या नवीन रॅम वेरिएंटची किंमत 13,990 रुपये असेल आणि लॉन्चच्या आधी डिवाइस सोबत बँक ऑफर्स दिल्या जातील. तसेच हँडसेटचा 4GB रॅम ऑप्शन 12,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. नवीन वेरिएंट मध्ये रॅम व्यतिरिक्त इतर कोणताही बदल झालेला नाही.

डिजाइन

डिजाइन बद्दल बोलायचे तर Vivo Y20 मध्ये वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. नॉच असल्यामुळे फोनच्या उजवीकडे आणि डावीकडे खूप कमी बेजल्स आहेत. तर बॉटमला थोडे जाड बेजल्स आहेत. डिवाइसच्या मागे वर्टिकल शेप कॅमेरा मॉड्यूल आहे. या सेटअप मध्ये ट्रिपल कॅमेरा आणि एक एलईडी सेंसर आहे. सोबत मागे बॉटमला वीवोची ब्रँडिंग आहे. तसेच डिवाइसच्या बॉटमला 3.5एमएम हेडफोन जॅक आणि स्पीकर ग्रिल आहे.

स्पेसिफिकेशन्स

Vivo Y20 मध्ये मध्ये आयपीएस 6.51-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे पिक्सल रिजोल्यूशन 720X1600 (HD+) आहे. तसेच फोन्स मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 460 प्रोसेसर आहे. सोबतच फोन मध्ये 4GB रॅम/6GB रॅम सह 64GB ची स्टोरेज आहे.

फोटोग्राफी पाहता Vivo Y20 मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये अपर्चर f/2.2 सह 13 मेगापिक्सल + अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सल + अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये अपर्चर f/1.8 सह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

फोन अँड्रॉइड 10 वर चालतो आणि यात पावरसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y20 मध्ये 18वॉट फ्लॅशचार्जचा ऑप्शन आहे. तसेच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here