आता आधार साठी चेहरा पण होईल स्कॅन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय नागरिकांची पहिली ओळख झालेल्या आधार कार्ड बद्दल सरकार एवढी काळजी घेते की सामान्य जनतेला जास्तीत जास्त सुविधा दिल्या जाऊ शकतील. काही दिवसांपूर्वी यूआईडीएआई म्हणजे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ई-आधार कार्ड वर 12 डिजीट वाल्या नंबर ऐवजी सोप्या क्यूआर कोड ची सुरवात केली होती तसेच आता हा सरकारी विभाग आधार कार्ड ला अजून एडवांस करणार आहे. लवकरच आधार कार्ड सोबत फेस रेक्गनाइजेशन फीचर पण जोडला जाईल.

आधार कार्ड साठी सध्या बोटांचे ठसे आणि आइरिश स्कॅनर यांचा वापर होतो. आधार कार्ड ला अजून स्मार्ट बनवत आता आधार कार्ड मध्ये फेस रेक्गनाइजेशन म्हणजे चेहरा ओळखण्याची टेक्निक पण जोडण्यात आली आहे. यूआईडीएआई चे म्हणेन आहे की ऑगस्ट महिन्या पासून चेहर्‍याच्या माध्यमातुन ओळख करण्याची ही टेक्निक आधार कार्ड सोबत जोडली जाईल. ही सेवा 1 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येईल असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण चे सीईओ अजय भूषण पांडे बोलले.

विशेष म्हणजे यूआईडीएआई ने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की आधार साठी फेस रेक्गनाइजेशन ची सुरवात करण्यात येईल. याबद्दल विभागा चे म्हणेन होते की ही सर्विस मजदूर वर्ग आणि वयोवृद्धांसाठी लाभदायक ठरेल. ते लोक ज्यांच्या हातांचे ठसे नष्ट होतात आणि ते वयोवृद्ध ज्यांचे वया सोबत बुबुळे कमजोर होतात, त्यांना फेस रेक्गनाइजेशन फीचर ने फायदा होईल.

तसेच कोणत्याही अपघातामुळे पण ही टेक्निक उपयोगी ठरू शकते. यूआईडीएआई कडून आधार साठी ओळख म्हणून आइरिस स्कॅनर आणि फिंगरप्रिंट सह फेस रेक्गनाइजेशन ची सुरवात ऑगस्ट च्या पहिल्या तारखे पासून करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here