Vivo ने वर्ष संपताना आपल्या Y-सीरीज मध्ये एक नवीन फोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन कंपनीने Vivo Y20A नावाने सादर केला आहे. भारतात वीवोची वाय सीरीजचे मोबाईल्स खूप लोकप्रिय आहेत. या फोन व्यतिरिक्त बुधवारी कंपनीने आपापल्या घरच्या मार्केट चीन मध्ये Vivo Y20 (2021) सादर केला होता. चला वीवो वाय20ए बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
किंमत आणि विक्री डेट
Vivo Y20A कंपनीने फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या फोनचा 3 जीबी + 64 जीबी स्टोरेज मॉडेलची भारतात किंमत 11,490 रुपये आहे. फोन दोन कलर ऑप्शन मध्ये येतो-नेब्युला ब्लू आणि डॉन व्हाइट. डिवाइस 2 जानेवारी पासून पार्टनर रिटेल स्टोर्स, वीवो इंडिया ई-स्टोर आणि इतर प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट्सवर विक्रीसाठी येईल.
हे देखील वाचा : Samsung Galaxy M01 तसेच Galaxy M01s झाले अजून स्वस्त, कंपनीने केल्या किंमती कमी
पावरफुल बॅटरी
Vivo Y20A मध्ये 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000mAh बॅटरी आहे. वाय20ए च्या बॅटरी लाइफ बद्दल कंपनीने दावा केला आहे कि यात 17 तासांपेक्षा जास्त ऑनलाइन एचडी मूवी स्ट्रीमिंग करता येईल. तसेच 10 तासांपेक्षा जास्त गेमिंग पण फोन मध्ये केली जाऊ शकते.
स्पेसिफिकेशन्स
फोनचे स्पेसिफिकेश्स पाहता, यात 6.51 इंचाचा एचडी+ (720×1,600 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे आणि हा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. यात 3 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज वाढवण्यासाठी युजर्सना माइक्रोएसडी कार्ड स्लॉटचा ऑप्शन मिळेल. फोन अँड्रॉइड 11 वर आधारित फनटच ओएस 11 वर चालतो.
हे देखील वाचा : सर्वात शानदार कॅमेरा आणि ताकदवान प्रोसेसर सह आला Vivo X60 व X60 Pro, जाणून घ्या किंमत
फोटोग्राफी पाहता Vivo Y20A मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअप मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेली 2-मेगापिक्सलची बोके लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच, फ्रंटला व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी एफ/1.8 अपर्चर असलेला 8-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
