विवो पुन्हा एकदा स्मार्टफोन बाजारात सक्रिय झाली आहे. एकामागून एक स्मार्टफोन आपल्या बजेट फ्रेंडली वाय सीरिजमध्ये सादर करत आहे. अलीकडेच कंपनीनं आपल्या होम मार्केटमध्ये Vivo Y52t 5G Phone सादर केला आहे जो 8GB RAM आणि MediaTek Dimensity 700 SoC सह जवळपास 14,800 रुपयांच्या बेस किंमतीत लाँच झाला आहे. वाय52टी 5जी नंतर आता कंपनीनं या सीरीज अंतगर्त नवीन 4जी मोबाइल फोन Vivo Y32t देखील अधिकृतपणे लाँच केला आहे जो 12,500 रुपयांची रेंजमध्ये लाँच झाला आहे. विवो वाय32टी दोन वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये लाँच झाला आहे ज्यातील एक MediaTek Helio G70 आणि दुसरा Qualcomm Snapdragon 680 वर चालतो.
Vivo Y32t चे स्पेसिफिकेशन्स
विवो वाय32टी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 20:9 अॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच स्टाईलसह येते, जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 89 टक्के आहे. हे देखील वाचा: 15 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात आला Vivo चा दमदार 5G Phone; 8GB RAM सह मिळतात तगडे फीचर्स

हा विवो मोबाइल दोन चिपसेट व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. एक Vivo Y32t MediaTek Helio G70 चिपसेटसह येतो ज्यात 8GB LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.1 storage देण्यात आली आहे. तर दुसरा Vivo Y32t स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 चिपसेटला सपोर्ट करतो आणि यात 8GB LPDDR4x RAM व 256GB UFS 2.2 storage देण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी Vivo Y32t मध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा सेटअप विवो वाय52टी सारखाच आहे. बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
Vivo Y32t ड्युअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 50MP सेल्फी कॅमेरा आणि 20GB RAM सह Vivo V25 ची भारतात एंट्री; बॅक पॅनल बदलतो रंग
Vivo Y32t Price
विवो वाय32टी च्या मीडियाटेक हीलियो जी70 मॉडेलची प्राइस 1099 युआन आहे जी भारतीय चलनानुसार 12,500 रुपयांच्या आसपास आहे. तर स्नॅपड्रॅगन 680 मॉडेलची किंमत 1299 युआन आहे जे जवळपास 14,800 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात. कंपनीचा इतिहास पाहता चीनमध्ये लाँच झालेला स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांच्या भेटीला देखील येऊ शकतो, फक्त भारतात लाँच झाल्यानंतर या स्मार्टफोनची किंमत मात्र वेगळी असू शकते.















