टेक कंपनी वीवोने अलीकडेच Vivo Y52s (T1 Version) स्मार्टफोन चीनी मार्केटमध्ये सादर केला होता जो Vivo Y52s चा बदललेला अवतार होता. तसेच, कंपनीने पुन्हा एकदा आपल्या वाय-सीरीजमध्ये एक नवीन फोन सादर केला आहे. कंपनीद्वारे नवीन फोन यूरोपियन मार्केटमध्ये Vivo Y52 5G नावाने सादर केला गेला आहे. या फोनची खासियत अशी आहे कि कंपनीने हा डिवाइस यूरोपमध्ये 5G मधील स्वस्त पर्याय म्हणून आणला आहे. इतकेच नव्हे तर यावर्षी मार्चमध्ये थायलंड मार्केटमध्ये सादर केलेला Vivo Y72 5G पण यूरोपमध्ये सादर केला गेला आहे. (Vivo Y52 5G launch with 5000mah battery Mediatek Dimensity 700 SOC triple rear cameras specifications price)
Vivo Y52 5G ची किंमत
सध्या Vivo ने Vivo Y52 5G ची किंमत सांगितली नाही. हा फोन 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटमध्ये आला आहे. तर दुसरीकडे Vivo Y72 5G ची किंमत EUR 299 (जवळपास 26,700 रुपये) आहे. वीवो वाय52 5G दुसऱ्या मार्केटमध्ये सादर करण्याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
हे देखील वाचा : Honor Play5 स्मार्टफोन Dimensity 800U 5G चिपसेट, 64MP क्वाड कॅमेरा आणि 66W रॅपिड चार्जसह लॉन्च
Vivo Y52 5G चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,408 डिस्प्ले) डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरसह येतो. हँडसेटमध्ये 4 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे, जी माइक्रो एसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे, ज्या सोबत ऑटोफोकस आहे, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे आणि 2 मेगापिक्सलची बोकेह लेंस आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
फोन अँड्रॉइड 11 आधारित Funtouch OS 11.1 वर चालतो. कनेक्टिविटी ऑप्शनसाठी वीवो वाय52 5जी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5mm हेडफोन जॅकचा समावेश आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा : Android 12 मुळे बदलून जाईल स्मार्टफोन वापरण्याचा अंदाज, बघा याचे 12 शानदार फीचर्स
Vivo Y52s (T1 Version) चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,408 डिस्प्ले) 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 प्रोसेसरसह येतो, सोबत 8 जीबी पर्यंत रॅम आहे. फोनची स्टोरेज 256 जीबी आहे. तसेच फोटोग्राफीसाठी यात डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे आणि दुसरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी आहे.
