Honor Play5 स्मार्टफोन Dimensity 800U 5G चिपसेट, 64MP क्वाड कॅमेरा आणि 66W रॅपिड चार्जसह लॉन्च

Honor Play5

Honor Play5 स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झाला आहे. ऑनरचा हा समार्टफोन मिडरेंज स्मार्टफोन आहे ज्याची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स Huawei Nova 8 SE स्मार्टफोनशी मिळते जुळते आहेत. हुवावेने हा स्मार्टफोन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च केला होता. Honor Play5 स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 800U चिपसेटसह सादर केला गेला आहे. ऑनरच्या या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ऑनरचा हा स्मार्टफोन Android 10 वर चालतो. इथे आम्ही तुम्हाला Honor Play5 स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

Honor Play5

Honor Play5 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ 1080 x 2400 पिक्सल आहे. फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये वाटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे ज्यात सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Honor Play5 स्मार्टफोनच्या मागे क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. ऑनरचा हा स्मार्टफोन कंपनीच्या युजर इंटरफेस Magic UI 4.0 वर चालतो जो Android 10 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

हे देखील वाचा : Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड

Honor Play5 स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 800U चिपसेटसह सादर केला गेला आहे. Honor Play5 स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 2.1 स्टोरेजसह सादर केला गेला आहे. ऑनरने या स्मार्टफोनमध्ये 3,800mAh ची बॅटरी दिली आहे जी 66W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. Honor Play 5 स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. ऑनरच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी डुअल SIM सपोर्ट, 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, GPS, USB-C, आणि 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 6,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Samsung Galaxy M32, किंमत असेल कमी

Honor Play5 ची किंमत किती आहे

Honor Play5 स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. ऑनरचा हा फोन 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेजच्या दोन ऑप्शनमध्ये येतो. या दोन्ही वेरिएंट्सची किंमत क्रमश: 2,099 युआन (जवळपास 23,800 रुपये) आणि 2,299 युआन (जवळपास 26,126 रुपये) आहेत. ऑनरचा हा स्मार्टफोन ग्रेडिएंट, पर्पल आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here