Android 12 मुळे बदलून जाईल स्मार्टफोन वापरण्याचा अंदाज, बघा याचे 12 शानदार फीचर्स

Google ने काल टेक मंचावर आपली सर्वात नवीन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम Android 12 सादर केली आहे. अ‍ॅडव्हान्स फीचर्सने सूसूज असलेल्या या अँड्रॉइड ओएसचा बीटा वर्जन पण कंपनीने प्रसिद्ध केला आहे जो आजपासून मोबाईल फोन्समध्ये डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे. हा नवीन ओएस कंपनीने जुन्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमपेक्षा वेगळा आणि आर्कषक बनवला आहे. नवीन अँड्रॉइड 12 जुन्या अँड्रॉइड 10 आणि अँड्रॉइड 11 पेक्षा लुकच्याबाबतीत खूप जास्त वेगळा आहे जो नक्कीच स्मार्टफोन युजर्स आणि मोबाईल वापरकर्त्यांना आवडेल. Android 12 चे सर्व फीचर्स आणि टेक्नॉलॉजी खासकरून Deeply Personal, Private and Secure आणि Better Together सेग्मेंटमध्ये आणण्यात आली आहे जी पूर्णपणे मजेदार, फायदेमंद आणि सिक्योर एक्सपीरियंस देते. (android 12 os top best features for smartphones )

1. डिजाईन

Android 12 लुकच्या बाबतीत गेल्या काही वर्षांमध्ये आलेल्या अँड्रॉइड ओएसपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. या ओएसमध्ये गुगलने डिजाईनवर खूप काम केले आहे. फोन स्टार्ट होण्यापासून त्यात केल्या जाणाऱ्या सर्व काम तसेच अ‍ॅप फंक्शन इत्यादीची डिजाईन आणि लेआउटमध्ये आर्कषक बदल दिसतील. ट्रांजिशनपासून थीमपर्यंत सर्व खूप डायनामिक ठेवण्यात आले आहे.

2. कलर

अँड्रॉइड 12 नंतर आता स्मार्टफोन फक्त लाइट किंवा डार्क थीमवरच काम करणार नाही. या नवीन Android OS नंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक रंगांची थीम काम करेल. अँड्रॉइड 12 काही असा बनवण्यात आला आहे कि तुमच्या फोनमध्ये तुम्ही जो फोटो वॉलपेपर म्हणून वापराल. फोन त्या फोटोच्या रंगांच्या हिशोबाने फोनची थीम बदलेल. होम स्क्रीनवरील टेक्स्ट आणि वॉच पण फोटोनुसार रंग बदलतील.

3. नोटिफिकेशन

आतापर्यंत जेव्हा पण स्मार्टफोन वापरण्यासाठी हातात घेतला जायचा तेव्हा सर्वप्रथम फोनच्या स्क्रीनवर नोटिफिकेशन्स दिसायच्या. संपूर्ण डिस्प्ले निरनिराळ्या अ‍ॅप्सच्या नोटिफिकेशन्सने भरलेला असायचा. परंतु Android 12 मध्ये असे होणार नाही. फोन लॉक असो किंवा अनलॉक, स्क्रीनवर कोणतीही नोटिफिकेशन फालतू राहणार नाही. या नवीन ओएसमध्ये नोटिफिकेशन्सचा वेगळा पॅनल बनवण्यात आला आहे जो खाली स्क्रॉल करून चेक केला जाऊ शकतो.

Android 12

4. Widget

Android 12 OS सह गुगलने अँड्रॉइड स्मार्टफोन्समधील विजेट्सची डिजाईन पण बदलली आहे. विजेट्सचा आकार, लुक आणि कलर सोबतच त्यांना वापरताना समोर येणाऱ्या अ‍ॅनिमेशन पण आता पूर्वीपेक्षा वेगळे असेल. अँड्रॉइड 12 मध्ये या विजेट्स आधीपेक्षा जास्त स्मूद, कलरफुल आणि वायब्रेंट दिसतील आणि यांना वापरण्याची पद्धत पण सुंदर असेल. जसे कि घड्याळाचा आकार मोठा करण्यात आला आहे आणि वॉल्यूम व रिंगर बार, कॅलेंडर, वेदर, म्यूजिक प्लेयर इत्यादींचा आकार पण बदलण्यात आला आहे.

5. पासवर्ड

Android 12 मध्ये स्मार्टफोन युजर्सची डेटा सिक्योरिटीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. वेगवेगळ्या वेबसाइट्सवर वापरण्यात येणारे पासवर्ड्स गुगलद्वारे सिक्योर ठेवले जातील. हे पासवर्ड्स फक्त सुरक्षेच्या दृष्टीने सेव राहतील असे नाही तर गरज पडल्यास काही क्लिक्समध्ये रिक्वायर्ड ऑप्शनमध्ये फिल पण होतील. गुगल क्रोम आणि अँड्रॉइड ओएसने मिळून यावर काम केले आहे.

6. ट्रांसपेरेंसी

Google ने शब्द दिला आहे कि अँड्रॉइड युजर्सच्या डेटाबद्दल पूर्णपणे पारदर्शकता बाळगली जाईल कि वापरकर्त्यांच्या कोणता डेटा कधी आणि कुठे वापरला जात आहे. Apple iPhone च्या ios प्रमाणे आता अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये स्क्रीनच्या उजवा कोपऱ्यात इंडिकेटर देण्यात आला आहे जो सांगेल कि कधी फोनचा माइक किंवा कॅमेरा वापरला जात आहे. म्हणजे जेव्हा एखादे अ‍ॅप्लिकेशन फोनचा कॅमेरा किंवा माइक्रोफोन वापरेल, तेव्हा स्क्रीनवर छोटी हिरवी लाईट येईल.

7. Privacy Dashboard

अँड्रॉइड 12 मध्ये प्राइवेसी डॅशबोर्ड पण जोडण्यात आला आहे जो खूप कामाचा फीचर आहे. हा टूल कोणत्या अ‍ॅपद्वारे किती वेळ मोबाईलचा डेटा, लोकेशन, इंटरनेट इत्यादीचा वापर केला आहे, याचा हिशोब ठेवेल. फक्त इतकेच नव्हे तर इथे युजर आपल्या मर्जीने निवडू शकतात कि त्यांना कोणत्या अ‍ॅपला कोणत्या गोष्टीचा अ‍ॅक्सेस द्यायचा आहे किंवा बंद करायचा आहे. स्मार्टफोन युजर आपल्या आवडीने लोकेशनची अचूकता पण ठरवू शकतील म्हणजे अ‍ॅपला तुमच्या लोकेशनची किती अचूक माहिती द्यायची आहे हे तुमच्या हातात असेल.

8. Private Compute Core

Android 12 मध्ये गुगलने प्राइवेट कम्प्यूट कोरचा समावेश केला आहे. या माध्यमातून मोबाईल युजर्सची काही लाईव माहिती जसे कि लाईव कॅप्शन, नाउ प्लेइंग आणि स्मार्ट रिप्लाई खाजगी ठेवण्यात येतील. हे फीचर्स AI क्षमतेपासून दूर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विनाकारण एडवरटाईजमेंटमुळे युजर्सना त्रास होणार नाही.

9. मल्टी डिवायस कनेक्टिविटी

बेटर टुगेदरच्या माध्यमातून गुगलने स्मार्टफोन फक्त कॉलिंग किंवा इंटरनेट पर्यंत मर्यादित ठेवले नाहीत तर मोबाईल फोनचा वापर इतर उपकरणांसोबत करण्यावर जोर दिला आहे. अँड्रॉइड 12 मध्ये मल्टी डिवायस कनेक्टिविटीच्या माध्यमातून स्मार्टफोन टीव्ही, फ्रिज, लाईट व अन्य होम अप्लायंसेज सोबतच लॅपटॉप इत्यादीसोबत कनेक्टिविटी सोप्पी आणि उपयुक्त बनवली आहे.

10. सिंगल टॅप

स्मार्टफोन आणि लॅपटॉपबद्दल बोलायचे तर Android 12 मुळे तुम्ही मोबाईल फोनमध्ये सिंगल टॅपने लॅपटॉप अनलॉक करू शकाल. फक्त इतकेच नव्हे तर स्मार्टफोनमध्ये येणारे मेसेज, कॉन्टेक्ट्स इत्यादी पण लॅपटॉपच्या माध्यमातून अ‍ॅक्सेस करता येतील. म्हणजे लॅपटॉपवर करताना फोन दूर ठेवला असेल तर तो लॅपटॉपवरून वापरता येईल.

Android 12 Feature

11. टीव्ही रिमोट

टेलीविजन बघताना आपण काही मिनिटांनी चॅनेल बदलत राहतो. अनेकदा असे होते कि टीव्हीचा रिमोट तुटले किंवा बॅटरी संपलेली असते. परंतु अँड्रॉइड 12 सह टीव्ही बघण्याचा अंदाज पण बदलेल. स्मार्टफोनच्या माध्यमातून टेलीविजन ऑपरेट करता येईल आणि यासाठी कोणत्या बाहेरील अ‍ॅप इत्यादीची पण गरज नसेल.

12. डिजिटल कार-की

होम अप्लायंसेज किंवा टीव्ही रिमोटमुळे तुम्ही खुश होत असाल तर सांगू इच्छितो कि Android 12 याद्वारे काही जास्त आणि चांगले करण्यासाठी डिजाईन केला गेला आहे. गुगलने डिजिटल कार की सादर केली आहे जी स्मार्टफोनच्या माध्यमातून कार लॉक आणि अनलॉक करण्यास मदत करेल. जर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला तुमची कार देत असाल तर हि डिजिटल की, सिक्योरिटी आणि प्राइवेसीसह दुसऱ्या फोनवर पण ट्रांसफर करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here