4 जीबी रॅम असलेल्या Vivo Y93 स्मार्टफोनची किंमत झाली 2 हजार रुपयांनी कमी, जाणून घ्या नवीन किंमत

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने गेल्यावर्षी आपल्या वाय सीरीज मध्ये Y93 हँडसेट 4जीबी रॅम सह लॉन्च केला होता, जिची किंमत 13,990 रुपये होती. यावर्षीच्या सुरवातीला कंपनीने या डिवाइसचा 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट सादर केला होता, ज्याची किंमत 12,990 रुपये होती.

वीवो अनेक दिवसांपासून आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती कमी करत आहे. यावेळी कंपनीने Vivo Y93 च्या दोन्ही वेरिएंटची किंमत 2,000 रुपयांनी कमी केली आहे. 91मोबाईल्सला या कपातीची माहिती रिटेलर्स द्वारा मिळाली आहे.

नवीन किंमत
Vivo Y93 च्या 4जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत आता 11,990 रुपये झाली आहे जी आधी 13,990 रुपये होती. तसेच याचा 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट आता 10,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा हँडसेट याआधी 12,990 रुपयांमध्ये विकला जात होता.

Vivo Y93 चे स्पेसिफिकेशन
Vivo Y93 मध्ये 6.22—इंचाची 1520 × 720 पिक्सल रेजल्यूशन वाली एचडी प्लस स्क्रीन देण्यात आली आहे. कपंनी ने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे आणि यात तुम्हाला फूल व्यू डिस्प्ले मिळेल. अर्थात ऊत बेजाल दिसणार नाहीत. फोनचा स्क्रीन टू बॉडी रे शियो 88.6 टक्के आहे. स्क्रीनच्या वर छोटीशी नॉच दिसेल ज्याला कंपनी ने हेलो नॉचचे नाव दिले आहे. नॉच वरच सेल्फी कॅमेरा आहे.

Vivo Y93 क्वालकॉम चिपसेट वर चालतो तर हा फोन मीडियाटेक प्रोसेसर आधारित आहे. फोन मीडियाटेक हेलियो पी22 चिपसेट वर सादर केला गेला आहे आणि यात 2.0गीगाहट्र्ज का चा ऑक्टाकोर प्रोसेसर मिळेल. भारतीय बाजरात हा फोन 4जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल स्टोरेज सह सादर केला आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे. हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे.

Vivo Y93 मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. फोन मध्ये 2जी, 3जी सोबत तुम्ही 4जी वोएलटीई चा वापर करता येईल. फोटोग्राफी साठी या फोनच्या बॅक पॅनल मध्ये 13एमपी + 2एमपी चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/2.2 अपर्चर आणि एफ/2.4 अपर्चर सह सादर केला आहे. तसेच सेल्फी साठी फ्रंट पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 8—मेगापिक्सल चा कॅमेरा आहे जो लो लाइट मध्ये पण चांगले फोटो घेतो.

Vivo Y93 मध्ये 4,030 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पण यात फास्ट चार्जिंग सपोर्ट नाही. फोन मध्ये माइक्रो यूएसबी पोर्ट 2.0 उपलब्ध आहे. हा फोन स्टारी ब्लॅक, नेब्युला पर्पल रंगात उपलब्ध आहे. सेल्स पॅक सोबत तुम्हाला यूएसबी केबल, सिम इजेक्टर, प्रोटेक्टिव फिल्म आणि प्रोटेक्टिव केस पण मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here