Home बातम्या मुंबईकरांची पसंती ‘वी’ ला; सर्वाधिक सब्स्क्रायबर्स वोडाफोन आयडियाकडे वळले

मुंबईकरांची पसंती ‘वी’ ला; सर्वाधिक सब्स्क्रायबर्स वोडाफोन आयडियाकडे वळले

ट्रायनं नुकताच मे महिन्यातील सब्स्क्रायबर डेटा प्रकाशित केला. त्यानुसार, मुंबईमध्ये एकूण 3,44,55,442 मोबाईल युजर्स असून नवीन 6,251 युजर्स सहभागी झाले आहेत. मुंबईमध्ये मे महिन्यात ‘वी’च्या सब्स्क्रायबर संख्येमध्ये सर्वात जास्त म्हणजे तब्बल 65,774 इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण सर्कलमध्ये एकूण 1,18,72,510 सब्स्क्रायबर्स ‘वी’च्या सेवांचा लाभ घेत आहेत.

मुंबई सर्कलमध्ये सर्वात जास्त सदस्य जोडणारी Vi ही एकमेव टेलिकॉम ऑपरेटर कंपनी आहे. एयरटेलने मे महिन्यात 54804 ग्राहक गमावले आहेत. एयरटेलकडे मुंबई सर्कलमध्ये सध्या एकूण 96,69,355 ग्राहक आहेत आहे, यापैकी 77,49,988 ग्राहक सक्रिय आहेत. मे महिन्यात Jio नं 2344 सदस्य गमावले आहेत. जिओची सध्या सर्कलमधील ग्राहक संख्या 1,18,21,185 आहे, यातील 91,17,680 ग्राहक सक्रिय आहेत. हे देखील वाचा: त्याच किंमतीत आता 4GB डेली डेटा; Vodafone Idea कडून ग्राहकांना मोठी भेट, न वापरलेला डेटा वाया जाणार नाही

अग्निवीर टेस्टची तयारी वी अ‍ॅपवर

वी अ‍ॅपवर अग्निवीर टेस्ट सिरीजमध्ये अग्निवीर एअरफोर्स एक्स ग्रुप, अग्निवीर एअरफोर्स वाय ग्रुप, अग्निवीर एअरफोर्स एक्स आणि वाय ग्रुप, अग्निवीर नेव्ही एमआर आणि अग्निवीर नेव्ही एसएसआर यांच्या प्रत्येकी 15 टेस्ट्ससह 5 टेस्ट सिरीज आहेत. या महिन्याच्या अखेरीस त्यात आर्मी टेस्ट सिरीजही त्यामध्ये जोडली जाईल.

वी अ‍ॅपवर अग्निवीर टेस्ट सिरीजमध्ये अग्निवीर एअरफोर्स एक्स ग्रुप, अग्निवीर एअरफोर्स वाय ग्रुप, अग्निवीर एअरफोर्स एक्स आणि वाय ग्रुप, अग्निवीर नेव्ही एमआर आणि अग्निवीर नेव्ही एसएसआर यांच्या प्रत्येकी 15 टेस्ट्ससह 5 टेस्ट सिरीज आहेत. या महिन्याच्या अखेरीस त्यात आर्मी टेस्ट सिरीजही त्यामध्ये जोडली जाईल. हे देखील वाचा: भारतातील 5G Service सप्टेंबर-ऑक्टबरमध्ये होऊ शकते लाँच; ‘या’ शहरांना मिळेल 5G Internet चा पहिला मान

वी जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर वी ग्राहक अग्निवीरबरोबरीनेच इतर अनेक सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांच्या तयारीसाठी साहित्य मिळवू शकतात. पहिला एक महिनाभर या तयारी साहित्याचा उपयोग करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही. ट्रायल कालावधी संपल्यानंतर पूर्ण वर्षभरासाठी फक्त 24९ रुपये इतकी नाममात्र सबस्क्रिप्शन फी भरून तुम्ही तुमचा अभ्यास सुरु ठेवू शकता. यामध्ये युजर्सना 150 पेक्षा जास्त केंद्र/राज्य सरकारी परीक्षांसाठी हव्या तितक्या (अनलिमिटेड) मॉक टेस्ट्स देखील देता येतात.

वी अ‍ॅपवर वी जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये भारतातील सर्वात मोठा नोकरी शोध प्लॅटफॉर्म अपना, इंग्रजी शिकण्यासाठीचा आघाडीचा लर्निंग प्लॅटफॉर्म एनगुरू आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांच्या तयारीसाठीचा प्लॅटफॉर्म परीक्षा यांना एकीकृत करून घेण्यात आले आहे.