भारतातील 5G Service सप्टेंबर-ऑक्टबरमध्ये होऊ शकते लाँच; ‘या’ शहरांना मिळेल 5G Internet चा पहिला मान

5G in India ची चर्चा गेले कित्येक दिवस सुरु आहे. 26 जुलैपासून भारतात सुरु असलेल्या 5G Spectrum Auction मुळे हे स्वप्न आता सत्यात येत असल्याचं भारतीयांना जाणवत आहे. या लिलावात Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone India आणि Adani Data Networks यांनी बोली लावली आहे. 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव स्वातंत्र्य दिनाच्या आधी म्हणजे 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. तसेच Spectrum allocation पूर्ण होताच सप्टेंबर-ऑक्टोबरपासून भारतात 5G Services सुरु करण्याची योजना आहे. अशी माहिती Telecom Minister Ashwini Vaishnaw यांनी प्रेस कॉफ्रेंसमधून दिली आहे.

भारतात कधी येणार 5जी सर्व्हिस

टेलिकॉम मिनिस्टर Ashwini Vaishnaw यांनी 5G Spectrum Auction च्या पहिल्या दिवशी मीडियाला संबोधित करताना भारतातील 5जी सर्व्हिस कधी सुरु होणार याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार विक्रमी वेळेत स्पेक्ट्रम अलोकेशन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यासाठी 24 तास दिवस-रात्र काम देखील करत आहे. अश्विनी वैष्णव यांच्या मते स्पेक्ट्रमचा लिलाव स्वातंत्र्य दैनच्या आधी पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे तसेच 14 ऑगस्ट पर्यंत Spectrum allocation पूर्ण होईल.

एकदा स्पेक्ट्रमचं वाटप पूर्ण झालं की केंद्र सरकार 5जी सर्व्हिस सुरु करण्यासाठी जास्त वेळ घेणार नाही. टेलीकॉम मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पेक्ट्रमच्या लिलावानंतर लगेचच 5G Network सुरु करण्यात येईल. Ashwini Vaishnaw यांनी स्पष्ट सांगितलं की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपल्याला भारतात 5जी सर्व्हिस मिळेल.

5G Network या शहरांमध्ये सर्वप्रथम मिळणार

सप्टेंबर-ऑक्टोबरपासून भारतात 5जी सर्व्हिस सुरु होईल. DoT म्हणजे Department of Telecommunications नुसार देशात 13 अशी शहरं आहेत जिथे सर्वप्रथम 5जी नेटवर्क सादर करण्यात येईल. या शहरांच्या यादीत Mumbai, Pune Ahmedabad, Bengaluru, Chandigarh, Chennai, Delhi, Gandhinagar, Gurugram, Hyderabad, Jamnagar, Kolkata आणि Lucknow चा समावेश आहे. परंतु केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.

5G Spectrum Auction मध्ये काय घडलं

समोर आलेल्या माहितीनुसार 5जी स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी चार फेऱ्या झाल्या. दरम्यान मिडबँड आणि हायबँडमध्ये कंपन्यांनी जास्त रस दाखवला आहे. 3300 मेगाहर्ट्ज आणि 26 गीगाहर्ट्ज बँड सोबतच 700 मेगाहर्ट्ज बँडवर जास्त बोली लागली आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की पहिल्या दिवशी 1.45 लाख कोटी रुपयांची बोली लागली आहे. पुढील दिवसांमध्ये कंपन्या जास्त सक्रिय होऊ शकतात.

4.3 लाख कोटी रुपयांचं 5G Spectrum

26 जुलैला सुरु झालेला स्पेक्ट्रमचा लिलाव 14 ऑगस्टला संपेल आणि यात 4.3 लाख कोटी रुपयांच्या 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव होईल. यात 4.3 लाख कोटी रुपयांच्या एकूण 72 गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा समावेश असेल जे 20 वर्षांसाठी देण्यात येईल. या ऑक्शनमध्ये 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz तसेच 2300 MHz फ्रीक्वेंसी असलेले लो बँड्स, 3300 MHz मिड फ्रीक्वेंसी बँड्स तर 26 GHz High frequency bands चा समावेश असेल. 5जी स्पेक्ट्रम ऑक्शननंतर भारत सरकारला जवळपास 80,000 ते 1 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणं अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here