Categories: बातम्या

वोडाफोन आइडिया ने 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्या प्रीपेड प्लानच्या किंमती, द्यावे लागतील जास्त पैसे

Vodafone-Idea ने आपल्या नवीन आणि महाग झालेल्या टॅरिफ प्लान्सची घोषणा केली आहे. महाग प्लान 3 डिसेंबर पासून लागू होतील. कंपनीने गेल्या महिन्यात सांगितले होतेकि त्यांना बिजनस मध्ये होत असलेल्या तोट्यामुळे टॅरिफच्या किंमती वाढवल्या जातील. टॅरिफच्या किंमतीत वाढल्यावर वोडाफोन-आइडियाचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान 19 रुपयांचा झाला आहे. तसेच कंपनीने आता दुसऱ्या नेटवर्क्स वर केल्या जाणाऱ्या कॉल्स साठी FUP लिमिट सेट केली आहे.

प्लान रिवाइज झाल्यानंतर वोडाफोनच्या पोर्टफोलियो मध्ये आता 365 दिवसांची वॅलिडिटी असलेले दोन, 84 दिवसांची वॅलिडिटी असलेले तीन, 28 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या 4 प्लानच्या व्यतिरिक्त दोन कॉम्बो प्लानचा पण समावेश झाला आहे, ज्यात डेटा आणि टॉकटाइम बेनिफिट मिळतात. पुढे तुम्हाला प्लान मध्ये मिळणाऱ्या फायद्यांची माहिती देत आहोत.

कॉम्बो वाउचर

वोडाफोन आइडियाच्या कॉम्बो वाउचर मध्ये 49 रुपये आणि 79 रुपयांच्या रिचार्जचा समावेश आहे. 49 रुपयांच्या वाउचर मध्ये यूजर्सना 38 रुपयांचा टॉकटाइम, 28 दिवसांची वैधता आणि 100MB डेटा मिळेल. तर 79 रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना 64 रुपयांचा टॉकटाइम, 200MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळेल.

28 दिवस वैधता असलेले नवीन वाउचर

टॅरिफ रिवाइज केल्यानंतर वोडाफोन-आइडिया यूजर्सना 28 दिवसांची वॅलिडिटी असलेले चार अनलिमिटेड पॅक दिले जात आहेत. यात 149 रुपये, 249 रुपये, 299 रुपये आणि 399 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. 149 रुपयांच्या प्लान मध्ये 2जीबी डेटा सह 300 एसएमएस आणि वोडाफोन नेटवर्क साठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तर 249 रुपयांच्या प्लान मध्ये अनलिमिटेड ऑन-नेट (वोडाफोन-आइडिया नेटवर्क) साठी अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन 100 एसएमएस सह रोज 1.5जीबी डेटा मिळेल. 299 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2जीबी डेटा आणि 399 रुपयांच्या प्लान मध्ये 3जीबी डेली डेटा मिळेल.

84 दिवसांची वैधता असलेले नवीन वाउचर

वोडाफोन-आइडियाने आता 84 दिवसांची वैधता असलेले तीन प्लान कंपनीने सादर केले आहेत. यात 379 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपयांचे प्लान आहेत. 399 रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना संपूर्ण वैधतेसाठी 6जीबी डेटा दिला जात आहे. प्लान अनलिमिटेड ऑन-नेट वॉइस कॉलिंग आणि 1000 फ्री एसएमएस सह येतो. 599 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात प्रतिदिन 1.5जीबी डेटा आणि 699 रुपयांच्या प्लान मध्ये डेली 2जीबी डेटा मिळत आहे. दोन्ही प्लान अनलिमिटेड ऑन-नेट कॉलिंग डेली 100 फ्री एसएमएस सह येतात.

तसेच 379 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 3000 मिनिट्स मिळतात, ज्याचा वापर ते दुसऱ्या नेटवर्क वर कॉल करण्यासाठी करू शकतात. 70 दिवसांची वॅलिडिटी असलेले सर्व प्लान्स बंद करण्यात आले आहेत.

365 दिवस वैधता असलेले वाउचर

वोडाफोन-आइडियाने दोन नवीन वार्षिक पॅक सादर केले आहेत. हे प्लान 1,499 रुपये आणि 2,399 रुपयांचे आहेत. दोन्ही प्लान्स मध्ये दुसऱ्या नेटवर्क्स वर कॉल करण्यासाठी 12,000 मिनिट्स मिळतात. तर वोडाफोन आइडियाच्या नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दोन्ही प्लान्सची वैधता 365 दिवसांची आहे. 1,499 रुपयांच्या प्लान मध्ये एकूण 24जीबी डेटा सह एक वर्षासाठी 3600 फ्री एसएमएस मिळतील. तसेच 2,399 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 1.5जीबी डेटा मिळेल.

वोडाफोन-आइडियाने सांगितले आहे कि ऑन-नेट कॉलिंगची FUP (fair usage policy) लिमिट संपल्यावर प्रत्येक कॉल साठी 6 पैसे प्रति मिनिट द्यावे लागतील.

Published by
Siddhesh Jadhav