Airtel आणि Reliance Jio ला टक्कर देण्यासाठी Vodafone Idea (Vi) देखील आता आपल्या प्लॅनसह अतिरिक्त डेटा मोफत देत आहे. वोडाफोन-आयडिया एक किंवा दोन नव्हे तर 4 रिचार्ज प्लॅनसह 75GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा देत आहे. ज्या प्लॅन्ससह एक्स्ट्रा डेटा मिळत आहे ते रिचार्ज प्लॅन दीर्घ वॅलिडिटी आणि अनेक बेनेफिट्ससह सादर करण्यात आले आहेत, त्यामुळे हे प्लॅन्स खास बनतात. पुढे आम्ही तुम्हाला सर्व प्लॅनची किंमत आणि मिळणारा Extra Free Data सोबतच बेनिफिट्सची माहिती दिली आहे.
Vodafone Idea च्या या प्लॅनमध्ये मिळतोय 75GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा
Vi च्या ज्या प्लॅन्समध्ये तुम्हाला 75GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे, त्यात 601 रुपये 901 रुपये, 1449 रुपये आणि 2889 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन्सचा समावेश आहे. चला आता या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती जाणून घेऊया.
Vodafone Idea Rs 601 प्लॅन
या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि यात डेली 3GB डेटा दिला जात आहे. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सर्व्हिस देखील दिली जात आहे. यात रोज 100 SMS मोफत मिळतात. युजर्सना वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळते, म्हणजे आठवडाभर न वापरलेला डेटा विकेंडला वापरता येईल. Vi Movies & TV VIP चा अॅक्सेस देखील मिळतो. फक्त इतकंच नव्हे तर, 16GB एक्स्ट्रा डेटा आणि 1 वर्षाचे Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळतं.
Vodafone Idea Rs 901 प्लॅन
901 रुपयांच्या प्लॅनमध्ये देखील युजर्सना 48GB अतिरिक्त डेटा मिळत आहे. प्लॅनसह 1 वर्षाचं Disney+ Hotstar चं सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. इतकेच नव्हे तर रिचार्जमध्ये 70 दिवसांची वैधता, डेली 3GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ घेता येतो. Plan मध्ये रोज 100 SMS मोफत मिळतात. Vi Movies & TV VIP चा अॅक्सेस दिला जात आहे.
Vodafone Idea Rs 1449 प्लॅन
Vi च्या 1449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 50GB पर्यंत एक्स्ट्रा डेटा दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 180 दिवस आहे. यात रोज 1.5GB डेटा मिळतो, तसेच 100 एसएमएस प्रति दिन आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा फायदा घेता येतो.
Vodafone Idea Rs 2889 प्लॅन
विआयच्या या प्लॅनसह कोणत्याही अतिरिक्त चार्जविना 75GB डेटा मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 100 SMS आणि 1.5GB डेली डेटा मिळेल. या प्लॅनसह युजर्सना 365 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये विआय हीरो अनलिमिटेड बेनिफिट्स देखील मिळतात.