Home बातम्या Vodafone Idea ची धमाकेदार ऑफर, युजर्सना 3 महीने मिळेल हा फायदा

Vodafone Idea ची धमाकेदार ऑफर, युजर्सना 3 महीने मिळेल हा फायदा

Vodafone Idea अनेक दिवसांपासून आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लान सादर करत आहे. आता कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये सादर केलेल्या वीकेंड डेटा रोलओवर बेनिफिट्सची मुदत वाढवली आहे. Weekend Data Rollover बेनिफिट्स मध्ये युजर्सची वाढती मागणी पाहता कंपनीची हि ऑफर आता 17 एप्रिल पर्यंत युजर्सना मिळेल. याआधी हि ऑफर 17 जानेवारीला संपणार होती. या ऑफर मध्ये तुम्ही सोमवार ते शुक्रवार दरम्यान वीकडेज वर न वापरलेला डेटा एकत्र केला जातो. त्यानंतर हा डेटा युजर्स वीकेंड वर म्हणजे शनिवार आणि रविवारी वापरू शकता.

या युजर्सना मिळेल फायदा

वीकेंड डेटा रोलओवर बेनिफिट कंपनीने कोणत्याही अतिरिक्त चार्जसह सुरु केले होते. या ऑफरचा फायदा सर्व प्रीपेड ग्राहकांना मिळेल, जे 249 रुपयांपेक्षा जास्त अनलिमिटेड प्लान घेत आहेत.

हे देखील वाचा : Realme X7 Pro 5G फोन येत आहे भारतात, सीईओने शेयर केले बाॅक्सचे फोटो, बघा कशी असेल डिजाईन

असे करा चेक

युजरना रोलओवर डेटा चेक करायचे असेल तर यासाठी Vi च्या मोबाईल ऍपचा वापर करावा लागेल. ऍप ओपन करून यात ऍक्टिव्ह पॅक आणि सर्विस सेक्शन वर जावे लागेल. तसेच युजर्स SSD कोड * 199 # च्या माध्यमातून पण हा बेनिफिट चेक करू शकतात.

हे देखील वाचा : OPPO F19 आणि F19 Pro च्या भारतातातील एंट्रीचा मार्ग मोकळा!, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

या प्लान मध्ये आहे डेटा रोलओवरचा फायदा

वीकेंड रोलओवर डेटा प्लानचा लाभ घेण्यासाठी युजर्स 249 रुपये, 297 रुपये, 299 रुपये, 398 रुपये, 399 रुपये, 599 रुपये, 299 रुपये, 449 रुपये, 699 रुपये, 595 रुपये, 795 रुपये, 895 रुपये, 1197 रुपये, 2399 रुपये आणि 2595 रुपयांपैकी कोणताही रिचार्ज करू शकतील.