Realme X7 Pro 5G फोन येत आहे भारतात, सीईओने शेयर केले बाॅक्सचे फोटो, बघा कशी असेल डिजाईन

इंडियन टेक मार्केट मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे कि टेक कंपनी Realme लवकरच भारतात आपली ‘एक्स 7 सीरीज’ लाॅन्च करणार आहे. हि सीरीज चीनी बाजारात आधीच आली आहे ज्यात Realme X7 आणि Realme X7 Pro सादर केले गेले होते. काही दिवसांपूर्वी यातील रियलमी एक्स7 प्रो स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन साइट बीआयएस वर स्पाॅट केला गेला होता, पण कंपनीने आतापर्यंत लाॅन्च डेटचा खुलासा केला नाही. पण आज रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्वीटर हँडल वर Realme X7 Pro चा रिटेल बाॅक्स शेयर केला आहे.

Realme X7 Pro चा रिटेल बाॅक्स स्वतः कंपनी सीईओने शेयर केला आहे. पण या ट्वीट मध्ये एक नाही तर 9 बॉक्सेसचा फोटो शेयर करण्यात आला आहे आणि सर्वांवर रियलमी एक्स7 प्रो लिहिण्यात आले आहे. हा फोटो शेयर करत माधव सेठ यांनी युजर्सना प्रश्न केला आहे कि यातील कोणता बाॅक्स त्यांना आवडला आहे. म्हणजे ट्वीट मध्ये असे स्पष्ट सांगितले नाही कि कोणता रिटेल बाॅक्स फोनचा वास्तविक बाॅक्स असेल आणि बाजारात येईल. चर्चा अशी आहे कि Realme X7 Pro भारतात 6एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या लेटेस्ट डायमनसिटी 1200 चिपसेट वर लाॅन्च केला जाऊ शकतो.

अशी आहे सीरीजची पावर

Realme X7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये रॅम 8 जीबी पर्यंत आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. हँडसेट मध्ये पावर देण्यासाठी 4300mAh ची बॅटरी आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : स्वस्त Realme C20 च्या लॉन्चच्या आधी समोर आली किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Realme X7 Pro मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखेच आहेत. तसेच फोनला पावर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme X7 Pro

दोन्ही फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि एक सारख्या लेंस देण्यात आल्या आहेत. फक्त कॅमेरा मधील अपर्चर मध्ये थोडा फरक आहे. Realme X7 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, (X7 मध्ये अपर्चर f/2.3) आणि (X7 Pro मध्ये अपर्चर f/2.25) सह अल्ट्रा-वाइड-अँगल 8 मेगापिक्सल सेंसर, अपर्चर /2.4 सह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक आणि वाइट पोर्टेट सेंसर व अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी (Realme X7 मध्ये अपर्चर f/2.5) आणि (Realme X7 Pro मध्ये अपर्चर f/2.45) सह 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here