Categories: बातम्या

Vi ने भारतात केली Wi-Fi calling ची सुरवात, जाणून घ्या कोणाला मिळेल हे फिचर

Vodafone Idea मिळून एक झालेल्या टेलीकॉम कंपनी Vi ने आपल्या युजर्सना नवीन भेट देत देशात Wi-Fi calling सर्विसची सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून टेस्टिंग स्टेज वर असलेली सर्विस काल कंपनीने अधिकृतपणे लॉन्च केली आहे. वीआय म्हणजे वोडफोन आयडियाची हि नवीन सुरवात कंपनीच्या युजर्ससाठी खूप फायदेशीर आहे ज्यामुळे फोन मध्ये नेटवर्क नसल्यास आजूबाजूला असलेल्या वाय-फाय सिग्नलच्या माध्यमातून ही वॉयस कॉलिंग करता येईल.

Vi ने वाय-फाय कॉलिंगची सुरवात करत सांगितले आहे कि हि सेवा सध्या देशाच्या निवडक सर्कल्स मधेच मध्ये चालू करण्यात आली आहे जो येत्या काही दिवसांत फेज टू फेज संपूर्ण भारतभर उपलब्ध होईल. वोडाफोन आयडियाने Wi-Fi calling service सध्या महाराष्ट्र, गोवा आणि कोलकाता सर्कल्स मध्ये सुरु केली आहे आणि इथे राहणारे मोबाईल युजर कंपनीच्या या नवीन सेवेचा फायदा घेतील.

आउटडोर कॉल क्वालिटी मध्ये वोडाफोन सर्वात पुढे

इंडोर कॉल क्वालिटीच्या बाबतीत वोडाफोनला 4.6 रेटिंग मिळाली आहे, तर आउटडोर कॉल क्वालिटी मध्ये कंपनीला 4.3 रेटिंग मिळाली आहे. तर दुसरीकडे आयडियाला इंडोर 4.9 रेटिंग मिळाली आहे तर आउटडोर 4.8 रेटिंग मिळाली आहे. एयरटेलला 3.9 आणि 3.5, बीएसएनएलला 3.9 आणि 4.3 व जियोला 3.9 आणि 3.6 रेटिंग मिळाली आहे.

विशेष म्हणजे ऑक्टोबर मध्ये समोर आलेल्या ट्रायच्या रिपोर्ट मध्ये बीएसएनएल कडे 3.4 / 5 फीडबॅक रेटिंग, रिलायंस जियो आणि वोडाफोन 3.3 रेटिंग आणि एयरटेलला 3.0 स्टार रेटिंग मिळाली होती. या महिन्यात युजर्स कडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावर BSNL वॉइस कॉल क्वालिटीच्या बाबतीत पहिल्या नंबर वर होती.

Published by
Siddhesh Jadhav