WhatsApp वरून पण पाठवता येतील पैसे, भारतात रोलआउट झाला हा खास फीचर

लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या युजर्सना चांगला एक्सपीरियंस देण्यासाठी नवीन फीचर्स उपलब्ध करवून देत आहे. अलीकडेच मध्ये कंपनीने Disappearing Messages फीचरची अधिकृत घोषणा केली होती. आता बातमी समोर आली आहे कि कंपनीने पेमेंट सर्विस Whatsapp Pay रोलआउट करायला सुरवात केली आहे. साल 2018 मध्ये बीटा युजर्स सह सुरु झालेल्या टेस्टिंग नंतर आता हे फीचर भारतात सर्व युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करण्यासोबतच पेमेंट पण करता येईल. कंपनीने हे नवीन फीचर अँड्रॉइड आणि iOS दोन्ही युजर्ससाठी सादर केले आहे.

व्हाट्सऍप पेमेंट सर्विस भारतात सुरु करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) काढून हिरवा कंदील मिळण्याची वाट बघत होता. आता NPCI ने व्हाट्सऍपला यूपीआईच्या मदतीने पेमेंट सर्विस सुरुकरण्याची परवानगी दिली आहे. सध्या यावर पण एक मर्यादा घालण्यात आली आहे. सध्या Whatsapp Pay च्या फर्स्ट सेगमेंट मध्ये NPCI ने 2 कोटी युजर्सची एक कॅप सेट केली आहे. याचा अर्थ असा आहे कि या युजर्सना आता व्हाट्सऍपच्या पेमेंट फीचरचा वापर करण्याचा ऑप्शन मिळेल.

आता हा फीचर देशात जारी करण्यात आला आहे. कंपनीने हा पेमेंट फीचर आधी बीटा वर्जन वरच सादर केला होता. बातमी लिही पर्यंत आमच्याकडील आयओएस डिवायस मध्ये व्हाट्सऍप अपडेट केल्यावर पण हा फीचर अपडेट झाला नव्हता पण अँड्रॉइड मध्ये हा फिचर दिसला आहे.

हे देखील वाचा : WhatsApp मध्ये येईल हा लईभारी फीचर, 7 दिवसानंतर आपोआप गायब होतील मेसेज

भारतात व्हाट्सऍपचा यूजरबेस जवळपास 40 कोटी युजर्सचा आहे. फेसबुक सीईओ मार्क जकरबर्गने म्हटले आहे कि आम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत काम करत होतो जे प्रत्येक गोष्टी नीट बघून पेमेंट सिक्यॉर आणि विश्वासू असल्याचे ठरवतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here