Home बातम्या Xiaomi ने आणली दमदार टेक्नोलॉजी, फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होईल स्मार्टफोन

Xiaomi ने आणली दमदार टेक्नोलॉजी, फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होईल स्मार्टफोन

स्मार्टफोनची बॅटरीला फोनमध्ये अनन्यसाधारण महत्व असते. हळूहळू स्मार्टफोनमध्ये बॅटरीचा वापर वाढत आहे. आजमितीला स्मार्टफोनची बॅटरी एकदा चार्ज केल्यास दीर्घकाळ ती टिकवणे कठीण काम आहे. हि समस्या दूर करण्यासाठी शाओमीने काही दिवसांपूर्वी आपल्या Mi 10 Ultra स्मार्टफोनसह 120 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सादर केला होता. हा ट्रेंड पुढे नेत आता दुसऱ्या कंपन्या पण आपले फोन 120 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह सादर करण्याची योजना बनवत आहेत. तर, शाओमीने यापुढे पाऊल टाकले आहे. शाओमीने 120 वॉट नाही तर 200 वॉट फास्ट चार्जिंग असलेली स्मार्टफोन टेक्नॉलॉजी अधिकृतपणे सादर केली आहे. (xiaomi announces 200w wired charging tech)

Xiaomi HyperCharge tech

Xiaomi ने आता स्मार्टफोनसाठी आपली नवीन HyperCharge टेक्नॉलॉजी सादर केली आहे. या टेक्नॉलॉजीसह कंपनीने दावा केला आहे कि हि टेक्नोलॉजी फक्त 8 मिनिटांत 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फुल चार्ज करेल. 120 वॉट फास्ट चार्जिंगने 4,000mAh बॅटरी असलेला फोन चार्ज करण्यासाठी 15 मिनिटे लागतात.

हे देखील वाचा : 5G फोन POCO F3 आणि POCO F3 GT येत आहे भारतात, कंपनीने केला खुलासा

कंपनीने आपली फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दाखवण्यासाठी कस्टम-निर्मिMi 11 Pro चा वापर केला आहे. डिवाइसमध्ये 4000 एमएएचची बॅटरी आहे जी तीन मिनिटांत झिरो ते 50 टक्के चार्ज झाली. असा पण दावा करण्यात आला आहे कि सुपर-फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वायर्ड चार्जिंगचा वापर करून आठ मिनिटांत डिवाइस पूर्णपणे चार्ज करती येईल.

या चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतील फोन

फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर करण्याचा करने असा नाही कि Xiaomi 200W चार्जिंग सपोर्ट असलेले डिवाइस लॉन्च करेल. कोणत्याही देशात डिवाइस व्यवसायिकरित्या उपलब्ध करण्यासाठी अनेक पैलू असतात. जसे कि, सुरक्षा, थर्मल मॅनेजमेंट, सर्टिफिकेशन, इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. जरी कंपनीने आपली नवीन हाइपरचार्ज टेक्नॉलॉजी सादर केली असली तरी ती लगेचच स्मार्टफोनमध्ये मिळेल अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. पण आशा आहे कि यावर्षीच्या शेवटपर्यंत किंवा पुढल्या वर्षीच्या सुरुवातीला प्रीमियम स्मार्टफोनमध्ये हि टेक्नॉलॉजी दिसेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy Tab S7 FE आणि Tab A7 Lite भारतात लॉन्च, यात आहे 10,090mAh बॅटरी आणि 6GB पर्यंत रॅम

Xiaomi फोल्डेबल फोन

जर फास्ट चार्जिंगव्यतिरिक्त एखाद्या टेक्नोलॉजीबाबत बोलायचे झाले तर शाओमी सध्या फोल्डोबल फोन्स बनवण्याचे काम करत आहे. या स्मार्टफोनमध्ये इंटरनल फोल्डिंग डिजाइन मिळेल. सध्या कंपनीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.