Samsung Galaxy Tab S7 FE आणि Tab A7 Lite भारतात लॉन्च, यात आहे 10,090mAh बॅटरी आणि 6GB पर्यंत रॅम

Samsung ने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात आपला पावरफुल टॅबलेट Samsung Galaxy Tab S7 Plus लॉन्च केला होता. सॅमसंगच्या या टॅबलेट डिवाइसची लोकप्रियता पाहून आता हा टॅब अजून शक्तिशाली करण्यात आला आहे. सॅमसंगने आपल्या टॅब एस सीरीजमध्ये दोन नवीन टॅबलेट्स सादर केले आहेत. Samsungने Galaxy Tab S7 FE आणि Galaxy Tab A7 Lite सादर केले आहेत. कंपनीने दोन्ही टॅबमध्ये से गॅलेक्सी टॅब एस7 एफई बजेट प्राइस सेगमेंटमध्ये फॅन फेवरिट फीचर आणि मोठ्या डिस्प्लेसह सादर केले आहेत. तसेच Galaxy Tab A7 Lite प्रीमियम प्रीमियम प्राइस प्वाइंटसह सादर केला गेला आहे. (samsung galaxy tab s7 fe tab a7 lite launched specifications features price)

Samsung Galaxy Tab S7 FE चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Tab S7 FE टॅबलेट कंपनीने मॅजिक S-Pen सपोर्टसह सादर केले आहेत. तसेच Galaxy Tab S7 FE टॅबलेटमध्ये 12.4-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2560×1600 पिक्सल आहे. टॅबलेट ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसरवर चालतो. हा एंड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. टॅबलेटमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटमध्ये आला आहे. हा टॅब कंपनीने चार रंगात Mystic Black, Mystic Silver, Mystic Green आणि Mystic Pick मध्ये लॉन्च केला आहे.

Samsung Galaxy Tab S7 FE

फोटोग्राफीसाठी टॅबलेटमध्ये रियर पॅनलवर 8MPचा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर फ्रंट पॅनलवर 5MPचा कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी Galaxy Tab S7 FE मध्ये एक 10,090mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. टॅबलेट 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात Dolby Atmos आणि AKG साउंडला सपोर्ट असलेले डुअल स्टेरिओ स्पीकर पण आहेत.

Samsung Galaxy Tab A7 Lite चे स्पेसिफिकेशन्स

Galaxy Tab A7 Lite बद्दल बोलायचे तर यात 8.7-इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1340×800 पिक्सल आहे. टॅबलेट दोन स्टोरेज वेरिएंट 3GB रॅम 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम 64GB स्टोरेजमध्ये आला आहे. टॅबलेटमध्ये प्रोसेसरच्या जागी MediaTek Helio P22 देण्यात आला आहे. हा अँड्रॉइड 11 वर चालतो.

Samsung Galaxy S7 FE

फोटोग्राफीसाठी या टॅबलेटमध्ये रियर पॅनलवर 8MP चा कॅमेरा आहे आणि फ्रंटला 2MPचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात Dolby Atmos आणि AKG साउंड सपोर्ट असलेला डुअल स्टेरिओ स्पीकर देण्यात आला आहे. टॅबलेटच्या WI-FI मॉडेलचे वजन 366 ग्राम आहे. तर LTE मॉडेलचे वजन 371 ग्राम आहे. पावर बॅकअपसाठी या टॅबमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Samsung Galaxy Tab S7 FE आणि Tab A7 Lite ची किंमत

सॅमसंग Galaxy Tab S7 FE च्या Wi-Fi वेरिएंटची किंमत करीब 6060,000 रुपये आहे जो 64GB स्टोरेज वेरिएंटसह येईल. Galaxy Tab S7 FE चा 128GB स्टोरेज मॉडेल जवळपास 65,000 रुपये किंमतीत विकत घेता येईल. Galaxy Tab A7 Lite चा Wi-Fi वेरिएंट अंदाजे 15,000 रुपयांमध्ये आला आहे. तर LTE मॉडेल 18,000 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here