5G फोन POCO F3 आणि POCO F3 GT येत आहे भारतात, कंपनीने केला खुलासा

POCO F3 GT

POCO ने मार्चमध्ये आपल्या गृहमार्केट म्हणजे चीनमध्ये ‘एफ’ सीरीज अंतगर्त Poco F3 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा एक 5G फोन होता जो क्वॉलकामच्या स्नॅपड्रॅगॉन 870जी चिपसेटवर चालतो. चीनमध्ये हिट झालेल्या या मोबाईल फोनची वाट भारतीय मोबाईल युजर पण आतुरतेने बघत आहेत. गेल्या काही दिवसांत या फोनसंबंधित अनेक लीक समोर आले आहेत पण आज पोको इंडियाने घोषणा केली आहे कि कंपनी भारतात POCO F3 5G लॉन्च करणार आहे. इतकेच नव्हे तर पोको एफ3 सह पावरफुल POCO F3 GT पण भारतात लॉन्च केला जाईल. (5g phone poco f3 and poco f3 gt india launch confirmed in q3)

पोको इंडियाने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवर ट्वीट करून खुलासा केला आहे कि कंपनी भारतात ‘एफ3’ सीरीजबद्दल येत आहे. ट्वीटमध्ये कंपनीद्वारे टीजर व्हिडीओ शेयर करण्यात आला आहे ज्यात POCO F3 आणि POCO F3 GT च्या इंडिया लॉन्चची माहिती देण्यात आली आहे. कंपनीने फोन लॉन्चची कोणतीही ठोस तारीख तर सांगितली नाही परंतु हे जरूर स्पष्ट केले आहे कि पोको एफ3 तसेच पोको एफ3 जीटी स्मार्टफोन तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलैमध्ये भारतात लॉन्च होऊ शकतो. टीजरमध्ये सीरीजमध्ये Mediatek Dimensity 1200 चिपसेट असल्याचा खुलासा पण केला आहे.

POCO F3 चे स्पेसिफिकेशन्स

पोको एफ3 फोनमध्ये 6.67-inch full-HD+ (1,080×2,400 pixels) एमोलेड डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच, फोन ऑक्टा कोर Qualcomm Snapdragon 870 SoC सह 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि फोन मध्ये 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

Poco F3

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्यात 48MP चा सोनी IMX582 प्राइमरी सेंसर असेल. तसेच 8MP चा सेकंडरी सेंसर अल्ट्रा वाइड एंगल लेंस आणि 5 मेगापिक्सलचा तीसरा मॅक्रो सेंसर आहे. फोनमध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा आहे.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, Infrared (IR), आणि USB Type-C पोर्ट आहेत. तसेच फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाईल. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,520mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

हे देखील वाचा : BSNL युजर्सना 100 रुपयांमध्ये मिळेल फुल टॉकटाइम, Jio-Airtel कडे पण नाही असा बेजोड प्लान

POCO F3 GT चे स्पेसिफिकेशन्स

ग्लोबल मार्केटमध्ये POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन full-HD+ (2,400 x 1,800 पिक्सल) आहे. पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्राइमरी कॅमेरा 64MPचा आहे, त्याचबरोबर 8MPचा कॅमेरा आणि दोन कॅमेरा सेंसर 2MP चे देण्यात आले आहेत. लिस्टिंगनुसार तिन्ही कॅमेऱ्यांची माहिती देण्यात आली नाही. 8MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा सेंसर आणि 2MP चे सेंसर मॅक्रो आणि डेप्थ सेंसर असू शकतात.

redmi k40 gaming phone

POCO F3 GT स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 SoC सह सादर केला गेला आहे. ई-कॉमर्स वेबसाइटच्या लिस्टिंगनुसार हा फोन 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. पोकोचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. POCO F3 GT स्मार्टफोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी, 2 SIM कार्ड स्लॉट, 5G कनेक्टिविटी, NFC, IR blaster, आणि फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. पोकोच्या या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स Redmi K40 gaming edition सारखे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here