Home बातम्या 12जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला Mi 9 Pro 5G

12जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज सह लॉन्च झाला Mi 9 Pro 5G

Xiaomi ने आज चीन मध्ये एका इवेंट मध्ये नवीन प्रॉडक्ट्स लॉन्च केला आहे. लॉन्च इवेंट दरम्यान कंपनीने Xiaomi Mi 9 Pro सादर केला आहे. हा स्मार्टफोन 5G सपोर्ट सह लॉन्च केला गेला आहेत. तसेच कंपनीने नवीन मी टीवी प्रो तीन साइज मध्ये सादर केली आहे. Xiaomi चा हा स्पेशल ईवेंट China च्या Beijing शहरात आयोजित केला गेला होता. चाल पुढे फोन बद्दल माहिती पाहू.

Mi 9 Pro 5G मध्ये डॉट-नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल पोजिशन मध्ये लेफ्ट कॉर्नर वर असेल. फोन नेक्स्ट-जनरेशन 5G सेल्यूलर कनेक्टिविटी वर चालतो. त्याचबरोबर कंपनीने 30W फॅन-कूल वायरलेस चार्जिंग स्टँड आणि 50 वॉट वाली 20000एमएएच ची पावर बॅंक सादर केली आहे.

किंमत

किंमतीबद्दल बोलायचे तर Mi 9 Pro 5G 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3699 युआन (जवळपास 36,874 रुपये), 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3799 युआन (जवळपास 38,000 रुपये) 12जीबी रॅम व 256जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 4099 युआन (जवळपास 40,883 रुपये) आणि 12जीबी रॅम व 512जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 4299 युआन (जवळपास 42,000 रुपये) आहे.

हे देखील वाचा: 8 जीबी रॅम, 4000एमएएच बॅटरी, 32 MP सेल्फी आणि 64 MP क्वॉड रियर कॅमेऱ्यासह Realme X2 लॉन्च

Mi 9 Pro 5G स्मार्टफोन

Mi 9 Pro 5G स्मार्टफोन पाहता हा Mi 9 चा रिफ्रेश्ड वर्जन आहे, जो त्याच डिस्प्ले साइज आणि डिजाइन सह येतो. पण यात हार्डवेयर मध्ये काही बदल केले गेले आहेत. यात सर्वात मोठा बदल प्रोसेसरचा आहे. Mi 9 Pro 5G मध्ये Snapdragon 855+ SoC आहे, जिचा क्लॉक स्पीड 2.96 गीगार्हट्ज आहे. फोन मध्ये 12जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. फोन मध्ये 6.39-इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.

पावर बॅकअप साठी फोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोन मध्ये नवीन 30W Mi Charge Turbo वायरलेस चार्जिंग टेक्नोलॉजी आहे, जी कंपनीने नुकतीच लॉन्च केली होती. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन फक्त 48 मिनिटांत 100 टक्के चार्ज होतो. तसेच फोन सोबत 45 वॉट फास्ट चार्जर मिळतो. फोन मध्ये 30 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट पण देण्यात आला आहे. वायरलेस चार्जिंगच्या मदतीने यूजर फोन 50 टक्के 25 मिनिटांत आणि 69 मिनिटांत 100 टक्के चार्ज करता येईल.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Vivo U10, किंमत 8,990 रुपयांपासून सुरु

कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर मी 9 प्रो 5जी मध्ये तीन रियर कॅमेरा आहेत. प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत 16 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सलचे सेंसर पण आहेत. रियर कॅमेरा सेटअप सुपर नाइट मोड, पोर्ट्रेट मोड बोकेह, एचडीआर, पनोरमा, 4K वीडियो रिकॉर्डिंग आणि स्लो-मोशन वीडियो रिकॉर्डिंग सारख्या फीचर सह येतो.