शाओमी भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड बनली आहे. स्वस्तात मिळणारे या कंपनीचे स्मार्टफोन पावरफुल स्पेशिफिकेशन्सने सुसज्ज असतात जे सामान्य जनतेच्या बजेट मध्ये फिट बसतात. आपल्या फॅन्सना अजून एकभेट देत शाओमी ने ‘मी डेज’ ची सुरवात केली आहे. या सेल मध्ये शाओमी ने आपला हिट स्मार्टफोन वर डिस्काउंट ऑफर सुरु केली आहे ज्यात रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6 व रेडमी नोट 5 प्रो सोबतच पोको एफ1 चा पण समावेश आहे. मी डेज मध्ये शाओमी स्मार्टफोन्स 5,000 रुपयांपर्यंच्या डिस्कॉउंटसह विकत घेता येतील.
शाओमी मी डेजचे आयोजन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर केले गेले आहे. मी डेजची सुरवात आज पासून झाली आहे जे 3 दिवस चालतील. 30 जानेवारी पर्यंत रेडमी नोट 6 प्रो, रेडमी 6, रेडमी नोट 5 प्रो आणि पोको एफ1 डिस्काउंटेड प्राइज वर विकत घेता येतील. सर्वात आधी पोको एफ1 पाहता मी डेज मध्ये पोको एफ1 चा सर्वात मोठा मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा मॉडेल 8जीबी रॅम सह 256जीबी मेमरीला सपोर्ट करतो.
पोको एफ1 चा 23,999 रुपयांचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वॉल वेरिएंट मी डेज अंतर्गत 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वाला पोको एफ1 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. रेडमी नोट 6 प्रो बद्दल बोलायचे तर फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनी ने 13,999 रुपयांच्या किंमतीती लॉन्च केला होता तर मी डेज मध्ये हा 12,999 रुपयांमध्ये घेता येतो.
रेडमी नोट 6 प्रो चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट मी डेज मध्ये 1,000 रुपयांच्या सुटीसह फक्त 14,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 13,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये त्याचबरोबर 15,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
मी डेज सेल मध्ये तीन दिवस रेडमी 6 स्मार्टफोन डिस्काउंट छूट सह सेल साठी उपलब्ध असेल. या सेल मध्ये रेडमी 6 चा 3जीबी रॅम व 32जीबी मेमरी वेरिएंट 7,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच फोनचा 3जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट 8,499 रुपयांमध्ये मिळेल.
शाओमी मी डेज मधून फोन विकत घेण्यासाठी (इथे क्लिक करा)
