Xiaomi बराच काळ भारतातील नंबर वन स्मार्टफोन ब्रँड स्थानावर कायम आहे. स्वस्त मोबाईल फोन्स पासून डिवायसेज पर्यंत सर्व सेग्मेंट मध्ये शाओमी लोकांना आवडते. स्मार्टफोन आणि ऍक्सेसरीज सोबतच स्मार्ट गॅजेट आणि स्मार्टटीव्हीच्या बाजारात पण शाओमीने खूप नाव कमावले आहे. Xiaomi Smart TV शानदार फीचर्स आणि कमी किंमत या गोष्टींमुळे भारतीयांना आवडतात. पण नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच शाओमीने आपल्या फॅन्सना झटका दिला आहे. कंपनीने आपल्या स्मार्ट टेलीविजन मॉडेलच्या किंमतीत 3,000 रुपयांची वाढ केली आहे.
कोणती टीव्ही झाली किती महाग
सर्वप्रथम Xiaomi Mi TV 4A पाहता या स्मार्टटीव्हीचा 32 इंच मॉडेल आतापर्यंत 13,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण आता कंपनीने या मॉडेलची किंमत 1,000 रुपयांनी वाढवली आहे. किंमत वाढवल्यानंतर मी टीव्ही 4ए 32 इंचाच्या मॉडेलची किंमत आता 14,999 रुपये झाली आहे.
हे देखील वाचा : 108एमपी कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10i 5G
त्याचप्रमाणे 32 इंच डिस्प्ले असलेला Xiaomi Mi TV 4A Pro चा भाव पण कंपनीने 1,000 रुपयांनी वाढवला आहे. हा स्मार्ट टेलीविजन आतापर्यंत बाजारात 13,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण आता भाववाढ झाल्यामुळे स्मार्टटीव्हीची किंमत 14,999 रुपये झाली आहे. तसेच Xiaomi 32 इंच HZ TV च्या किंमतीत 1,500 रुपयांची वाढ झाली आहे त्यामुळे 14,499 रुपयांचा टीव्ही आता 15,999 रुपयांना मिळत आहे.
Xiaomi Mi TV 4A 43 इंच मॉडेलची किंमत कंपनीने 2,500 रुपयांनी वाढवली आहे. हि स्मार्टटीव्ही आतापर्यंत 22,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती, पण आता किंमत वाढवल्यामुळे हा टीव्ही मॉडेल 25,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 43 इंच HZ TV ची किंमत पण 2,500 रुपयांनी वाढून 23,499 रुपयांवरून 25,999 रुपये झाली आहे.
हे देखील वाचा : Xiaomi चालली Apple च्या वाटेवर, चार्जरविना लॉन्च केला 108MP कॅमेरा असलेला Mi 11, सर्वात ताकदवान प्रोसेसर आहे यात
Xiaomi Mi TV 4X पाहता या टीव्हीच्या सर्व मॉडेल वर कंपनीने थेट 3,000 रुपयांची वाढ केली आहे. या स्मार्टटीव्हीचा 43 इंच मॉडेल आधी 25,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता, पण आता याची किंमत वाढून 28,999 रुपये झाली आहे. 31,999 रुपयांमध्ये मिळणारा 50 इंचाचा मॉडेल महाग होऊन 34,999 रुपयांचा झाला आहे तसेच 36,999 रुपयांचा 55 इंच मॉडेल आता 44,999 रुपयांमध्ये मिळेल.
