108एमपी कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला Xiaomi चा पावरफुल फोन Mi 10i 5G

Xiaomi ने आज भारतात आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत ‘मी सीरीज’ चा विस्तार केला आहे. कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन Xiaomi Mi 10i 5G भारतात लॉन्च केला आहे, ज्याची किंमत 20,999 रुपयांपासून सुरु होत आहे. शाओमी मी 10आय फक्त दिसायला आर्कषक आहे नाही तर या फोन मध्ये स्पेसिफिकेशन्स पण शानदार देण्यात आले आहेत आणि हा 5जी कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. Mi 10i 5G येत्या 7 जानेवारी पासून अमेझॉन इंडिया वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लुक व डिजाईन

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर लॉन्च केला आहे. फोन मध्ये बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या तीन कडा साईड बेजल्सशी जोडल्या गेल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यावर सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर मध्यभागी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर्तुळाकार आहे. या सेटअपच्या बाहेर डावीकडे फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वरून फिंगरप्रिंट सेंसर गायब आहे तसेच खालच्या बाजूला Mi लोगो आणि 5G लिहिण्यात आले आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10i 5G कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला आहे जो 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करते जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येते. मी 10आय 5जी कंपनीने अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला आहे जो मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये र्कोटेक्स ए-77 सीपीयू वर काम करणारा क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट देण्यात आला आहे जो 5जी कनेक्टिविटी सह येतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10i 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 108 मेगापिक्सलचा HM2 sensor देण्यात आला आहे. तसेच हा शाओमी फोन 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,820एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

वेरिएंट्स व किंमत

Xiaomi Mi 10i 5G भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 20,999 रुपये आहे. तसेच फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि या वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. शाओमी मी 10आय 5जी चा सर्वात मोठा वेरिएंट 12 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 23,999 रुपये आहे. हा फोन Midnight Black, Atlantic blue आणि Pacific Sunrise कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here