Xiaomi MIX Fold 4 आणि MIX Flip हे फोल्डेबल स्मार्टफोन चीनमध्ये झाले लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

शाओमीने आज दोन नवीन फोल्डेबल डिव्हाईस लाँच केली आहेत. त्यापैकी एक ब्रँडचा पहिला क्लॅमशेल फ्लिप Xiaomi MIX फ्लिप आहे. तर, दुसरा हॉरीजेंटल बूक स्टाईल असलेला Xiaomi MIX Fold 4 हा फोल्डिंग मोबाईल आहे. हे दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. ब्रँडने फोनमध्ये मजबूत स्पेसिफिकेशन आणि डिझाईन दिले आहेत. चला पुढे त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये यांची माहिती तपशीलवार जाणून घेऊया.

Xiaomi MIX Fold 4 चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Xiaomi MIX Fold 4 चा एक्स्टर्नल डिस्प्ले क्वाड-कर्व्ह एजसह 6.56 इंचाचा आहे. त्याचवेळी इंटरनल स्क्रीन 2,488 x 2,224 पिक्सेलच्या रिझोल्यूशनसह 7.98 इंचाची आहे. दोन्ही स्क्रीनमध्ये OLED पॅनल्स, 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्स पीक ब्राईटनेस, HDR10+, HDR व्हिव्हिड आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट मिळतो.
  • चिपसेट: Xiaomi MIX Fold 4 मध्ये परफॉर्मन्ससाठी Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर लावण्यात आला आहे. यासोबतच उष्णता कमी करण्यासाठी यात अल्ट्रा-थिन व्हीसी सिस्टीम देण्यात आली आहे.
  • रिअर कॅमेरा: फोटोग्राफीसाठी Xiaomi MIX Fold 4 मध्ये Leica-ब्रँडेड क्वाड रिअर कॅमेरे आहेत. ज्यामध्ये OIS सह 50 मेगापिक्सेलची OmniVision 800 लेन्स + 12MP अल्ट्रा-वाईड OV13B10 लेन्स + 3x झूम असलेल्या 50 मेगापिक्सेलची टेलिफोटो OV60A40 लेन्स आणि 10MP पेरिस्कोप टेलीफोटो Samsung S5K3K1 5x झूम लेन्स OIS तंत्रज्ञानासह देण्यात आली आहे.
  • फ्रंट कॅमेरा: फोनच्या इंटरनल स्क्रीनवर 16 मेगापिक्सेलची OmniVision OV16F40 लेन्स आणि इंटरनल डिस्प्लेवर 20 मेगापिक्सेलची OmniVision OV16F40 लेन्स लावण्यात आली आहे.
  • बॅटरी: फोल्डेबल फोनमध्ये 5,100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याला 67W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
  • ओएस: डिव्हाईस अँड्रॉईड 14 आधारित HyperOS 1.0 वर काम करते.
  • इतर: मोबाईलमध्ये Wi-Fi 7, Bluetooth 5.3, NFC, 5G नेटवर्क, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, अनेक AI वैशिष्ट्ये, टू वे सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी, IPX8 रेटिंग, ड्युअल स्पीकर यांसारखी अनेक फिचर्स आहेत.
  • डायमेंशन: फोल्ड केल्यावर फोनचे डायमेंशन 9.47 मिमी आणि उघडल्यावर 4.59 मिमी असते.

Xiaomi MIX Flip चे स्पेसिफिकेशन

  • इंटरनल डिस्प्ले: Xiaomi MIX Flip मध्ये 6.86 इंचाची फोल्डेबल OLED TCL C8+ LTPO स्क्रीन, FHD+ 2912 x 1224 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 3000 निट्स कमाल ब्राईटनेस आणि 2160Hz PWM डिमिंग सपोर्ट मिळतो.
  • एक्स्टर्नल स्क्रीन: फोनमध्ये 4.01 इंचाची मोठी OLED TCL C8+ स्क्रीन मिळते. त्यावर 1392 x 1208 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 2500 निट्स कमाल ब्राईटनेस, 2160Hz PWM डिमिंग आणि Xiaomi Dragon क्रिस्टल ग्लास चे संरक्षण दिले जात आहे.
  • प्रोसेसिंग: या फ्लिप मोबाईलमध्ये, ब्रँडने क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट, 3500mm² 3D VC लिक्विड कूलिंग सिस्टम आणि LPDDR5x RAM व UFS 4.0 इंटरनल स्टोरेज तंत्रज्ञान दिले गेले आहे.
  • बॅटरी: Xiaomi MIX Flip मध्ये दीर्घ बॅकअपसाठी 4,780mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
  • फ्रंट कॅमेरा: हा मोबाईल 32 मेगापिक्सेलच्या Sony IMX816 कॅमेऱ्याने सुसज्ज आहे.
  • मागील कॅमेरा: फोनच्या रिअर मध्ये 50 मेगापिक्सेलची OmniVision 800 लेन्स OIS सह देण्यात आली आहे. त्यासोबतच 50 मेगापिक्सेलची OV60A4 टेलिफोटो लेन्स 2x झूम आणि OIS सह मिळते.
  • इतर: डिव्हाईस मध्ये साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्पीकर, 2 x G1 बॅटरी मॅनेजमेंट चिप, R1 करंट बॅलन्सिंग चिप, T1 सिग्नल Enhanced चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे.
  • डायमेंशन: फोन फोल्ड केल्यावर 74 x 74 x 16 मिमी आणि उघडल्यावर 167.5 x 74 x 7.6 मिमी होतो.

Xiaomi Mix Fold 4 ची किंमत

Xiaomi मिक्स फोल्ड 4 बेस मॉडेल 12GB+256GB मॉडेल 8,999 CNY सुमारे 1,03,600 रुपये, मिड व्हेरिएंट 16GB+512GB ची किंमत 9,999 CNY अंदाजे 1,15,100 रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंट 16GB+1TB ची किंमत 10,999 CNY अंदाजे 1,26,600 रुपये आहे. हा स्मार्टफोन काळा, पांढरा, निळा आणि कार्बन फायबर अशा चार रंगात येतो.

Xiaomi Mix Flip ची किंमत

Xiaomi मिक्स फ्लिप फोन 12GB + 256GB च्या बेस मॉडेलची किंमत 5,999 CNY सुमारे 69,080 रुपये, 16GB + 512GB व्हेरिएंट ची किंमत CNY 6,499 अंदाजे 74,800 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिएंटची किंमत CNY 7,299 अंदाजे 84,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा ग्राहकांना काळा, पांढरा आणि जांभळा अशा तीन रंगात मिळेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here