8620 एमएएच बॅटरी आणि 128जीबी मेमरी सह लॉन्च झाला शाओमी मी टॅब 4 प्लस, जाणून घ्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत

मुख्य मोबाईल फोन निर्माता कंपनी शाओमी ने या वर्षी जून मध्ये आपला नवीन टॅबलेट मी पॅड लॉन्च केला होता. तर आता कंपनी ने याचा अपग्रेड वर्जन सादर केला आहे. शाओमी ने मी पॅड 4 प्लस आणला आहे. 10.1 इंचाच्या मोठया स्क्रिन सह सादर करण्यात आलेला हा टॅबलेट सध्या कंपनी ने चीन मध्ये सादर केला आहे. भारतात हा कधी येईल याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मोठ्या स्क्रीन वाल्या या टॅबलेट मध्ये मोठी आणि ताकदवान बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक अपग्रेड आहेत ज्यामुळे हा टॅबलेट दर्जेदार टॅबलेट्सच्या श्रेणीत येतो.

शााओमी चे इतर डिवाइस प्रमाणे हा पण मेटल डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे. शाओमी मी पॅड 4 प्लस मध्ये तुम्हाला 10.1-इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनी ने यात डब्ल्यूयूएक्सवीजीए डिस्प्ले दिला आहे आणि याचे स्क्रीन रेजल्यूशन 1920 x 1200 पिक्सल आहे. सध्या बेजल लेस डिस्प्ले चा ट्रेंड आहे पण टॅबलेट मध्ये तुम्हाला 16:9 आसपेक्ट रेशियो वाली स्क्रीन मिळेल. चांगली बाब ही की टॅबलेट मध्ये फेस अनलॉक मिळेल जो आजकालच्या प्रीमियम फोन मध्ये असतो.

शाओमी मी पॅड 4 प्लस कंपनी ने स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह सादर केला आहे आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. त्या सोबत 4जीबी रॅम आहे. हा डिवाइस 64जीबी आणि 128जीबी इंटरनल मेमरी सह उपलब्ध आहे आणि दोन्ही मध्ये तुम्हाला 256जीबी पर्यंतचा कार्ड सपोर्ट मिळेल. उत्तम ग्राफिक्स साठी यात एड्रिनो 530जीपीयू आहे.

कॅमेरा पाहता कंपनी ने यात 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फी कॅमेरा 5-मेगापिक्सल चा आहे. टॅबलेट मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. रियर कॅमेरा सोबत ओवी13855 लेंस चा वापर करण्यात आला आहे तर फ्रंट सेंसर सॅमसंग एस5के5ई8 आहे. सिक्योरिटी साठी फेस अनलॉक व्यतिरिक्त फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध आहे. तर डेटा साठी यात 4जी सह, वाईफाई, ब्लूटूथ 5.0, जीपीएस+, ग्लोनॅस आणि यूसबी टाइप—सी मिळेल. शाओमी मी पॅड 4 प्लस मध्ये 8620 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये या टॅबलेट ची बेसिक किंमत जवळपास 19,500 रुपये आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here