12जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Xiaomi चा पावरफुल फोन Redmi K20 Pro

Xiaomi ने याच आठवड्यात अंर्तराष्ट्रीय टेक बाजारात आपला फ्लॅगशिप सेग्मेंट वाढवत रेडमी के सीरीज सादर केली आहे. कंपनीने Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन टेक मंचावर सादर केले आहेत. पॉप-अप कॅमेरा आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेले हे स्मार्टफोन मीडरेंज मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स देते आहेत. Xiaomi ने Redmi K20 आणि K20 Pro सध्या चीनी बाजारात उतरवले आहेत तिथे हा 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. आता बातमी येत आहे कि शाओमी Redmi K20 Pro अजून ताकदवान होणार आहे आणि या फोनचा 12जीबी रॅम वेरिएंट पण लॉन्च होईल .

Xiaomi Redmi K20 Pro च्या या नवीन 12जीबी रॅम वेरिएंटचा खुलासा चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वरील लिस्टिंग मधून झाला आहे. टेना वर Redmi K20 Pro तीन रॅम वेरिएंट्स मध्ये दाखवण्यात आला आहे ज्यात 6जीबी रॅम, 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅम आहे. Xiaomi ने 28 मे ला हा चीन मध्ये लॉन्च केला आहे तसेच हा फोन 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम वेरिएंट मध्ये बाजारात आला आहे. टेना च्या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी रेडमी के20 प्रो चा 12जीबी रॅम वेरिएंट पण बनवत आहे. म्हणजे Redmi K20 Pro लवकरच 12जीबी रॅम मेमरी सह बाजारात येईल.

डिजाईन
Redmi K20 सीरीज सोबतच Xiaomi ने कमी किंमतीत पॉप-अप सेल्फी कॅमऱ्याची सुरवात केली आहे. Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन मॉडेल बेजल लेस डिस्प्ले वर बनला आहे जो पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो . हा कॅमेरा फोन बॉडीच्या आताच असतो जो सेल्फीची कमांड देताच बॉडीच्या बाहेर येतो आणि फोटो क्लिक करतो . सिक्योरिटी साठी कंपनीने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह सादर केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो पॅनलच्या मधोमध वर्टिकल शेप मध्ये आहे.

Redmi K20 Pro
हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर बनला आहे जो 1,080 x 2,340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले सपोर्ट करतो. स्क्रीन प्रोटेक्शन साठी कंपनीने हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला आहे. Redmi K20 Pro शाओमी द्वारा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज करण्यात आला आहे जो 7व्या जेनरेशन टेक्नॉलॉजी वर बनला आहे. कंपनीने Redmi K20 Pro एंडरॉयड 9 पाई सह मीयूआई10 वर सादर केला आहे.

Redmi K20 Pro मध्ये प्रोसेसिंग साठी 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 देण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह चालतो . तसेच ग्राफिक्स साठी हा फोन एड्रेनो 640 जीपीयू ला सपोर्ट करतो. Xiaomi ने रेडमी के सीरीजचा हा फोन गेमिंग यूजर्सना लक्षात घेऊन बनवला आहे. या मध्ये गेम टर्बो 2.0 मोड देण्यात आला आहे जो खूप स्मूथ आणि लॅग फ्री गेमिंग परफॉर्मेंस देतो .

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi K20 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.7 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये एफ/2.4 अर्पचर वाला 13-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि त्याच अपर्चर वाली 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी बद्दल बोलायचे तर रेडमी के20 प्रो एफ/2.0 अपर्चर वाल्या 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi K20 Pro 4जी फोन आहे जो डुअल सिमला सपोर्ट करतो. फोन मध्ये डुअल बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ, एनएफसी व यूएसबी टाईप-सी पोर्ट सह 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. सिक्योरिटी साठी फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअप साठी फोन मध्ये 27वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत
Redmi K20 Pro कंपनी द्वारा 4 वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. फोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम सह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली जो 2999 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी अनुसार 30,200 रुपयांच्या आसपास आहे. तसेच Redmi K20 Pro चा 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 2799 युआन (जवळपास 28,200 रुपये), 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज वेरिएंट 2599 युआन (जवळपास 26,200 रुपये) आणि 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 2499 युआन (जवळपास 25,200 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here