Xiaomi घेऊन येत आहे Redmi K20 Pro, स्पेसिफिकेशन्स असे जे देतील OnePlus 7 Pro ला पण टक्कर! एवढी असेल किंमत

Xiaomi ने याच आठवड्यात भारतीय बाजारात Redmi Note 7S स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 48एमपी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रेडमी नोट सीरीज नंतर आता कंपनी Redmi K सीरीज पण वाढवणार आहे. शाओमीने घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 28 मे ला बीजिंग मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून Redmi K20 सीरीज सादर केली जाईल. आता लॉन्चला एक आठवडा असताना शाओमीच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स सोबत याची किंमत पण समोर आली आहे.

येत्या 28 मे ला Xiaomi या नवीन सीरीज अंतर्गत Redmi K20 सोबत Redmi K20 Pro स्मार्टफोन पण लॉन्च करेल. Redmi K20 Pro बद्दल बोलले जात आहे कि शाओमी हा फोन पॉप अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च करेल. Redmi K20 Pro कंपनीचा फ्लॅगशिप डिवाईस असेल जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला पण सपोर्ट करेल. Redmi K20 Pro ला लॉन्च आधीच OnePlus 7 Pro चा प्रतिस्पर्धी असल्याचे बोलले जात आहे.

Redmi K20 Pro
Xiaomi च्या या आगामी डिवाईस बद्दल प्र​सिद्ध टिपस्टर स्लॅशलीकने पोस्ट शेयर केली आहे ज्यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. या पोस्ट नुसार Redmi K20 Pro 1080 X 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्ले वर सादर केला जाईल. फोन ​डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केला जाईल.

Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन्ही फोन मॉडेल एंडरॉयड 9 पाई वर सादर केले जातील तसेच यात मीयूआई 10 यूजर इंटरफेस मिळेल. स्लॅशलीक नुसार Redmi K20 Pro क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 ​पर सादर केला जाईल. तसेच Redmi K20 मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 7 सीरीजचा चिपसेट असू शकतो.

दमदार रॅम व स्टोरेज वेरिएंट
लीक नुसार Redmi K20 सीरीजचा फोन शाओमी द्वारा 4 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8जीबी रॅम असेल, सोबतच हा वेरिएंट 256जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. त्याचबरोबर हा फोन 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी, 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज सह लॉन्च केला जाऊ शकतो.

पावरफुल असेल कॅमेरा
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. लीक नुसार Redmi K20 Pro च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर मिळेल. तसेच Redmi K20 सीरीज मध्ये एफ/2.4 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस दिली जाऊ शकते.

Xiaomi Redmi K20 Pro पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह टेक मंचावर सादर करेल. लीक मध्ये सांगण्यात आले आहे​ कि हा फोन 20-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल जो एफ/2.0 अपर्चर क्षमतेचा असेल. त्याचप्रमाणे Redmi K20 Pro इन-​डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह पण येईल ज्यामुळे फोनच्या डिस्प्लेला टच केल्याने हा अनलॉक होईल. हा सेंसर 7व्या जेनरेशनचा असेल.

Redmi K20 Pro मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट पण दिला जाईल. तसेच Redmi K20 Pro मध्ये 3.5एमएम जॅक तसेच एनएफसी सारखे फीचर्स पण असतील. स्लॅशलीक नुसार Redmi K20 Pro ची किंमत 360 यूरो असेल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. येत्या 28 मे ला फोनचे स्पेसिफिकेशन्स पण समोर येतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here