Xiaomi च्या सब-ब्रँड Redmi ने आपला गेमिंग स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रेडमीचा हा फोन कंपनीच्या Redmi K40 सीरीजचा सदस्य आहे. हा गेमिंग फोन Redmi K40 Game Enhanced Edition या नावाने सादर केला गेला आहे. रेडमी ब्रँडचा हा पहिला गेमिंग स्मार्टफोन आहे, जो कंपनीने गेमिंग ट्रिगर बटणसह सादर केला आहे. रेडमीच्या या गेमिंग स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपच्या चारही बाजूंनी अॅबिएंट लाइट देण्यात आली आहे, जी वेगवेगळे रंग बदलते. हि लाइटिंग कॉल, मेसेज आणि चार्जिंग दरम्यान LED नोटिफिकेशन म्हणून काम करते. Redmi K40 Game Enhanced Edition मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी डिस्प्ले पंचहोल कटआउट देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला या फोनबाबत सविस्तर माहिती देत आहोत. (Xiaomi Redmi K40 enhanced edition launched check price and specifications)
Redmi K40 Game Enhanced Edition : किंमत
Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोनची किंमत पाहता या फोनचा बेस वेरिएंट 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 1,999 RMB (जवळपास 23,000 रुपये) च्या किंमतीत सादर केला गेला आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनचा दुसरा वेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 2,199 RMB (जवळपास 25,300 रुपये), तिसरा वेरिएंट 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 2,399RMB आणि चौथा वेरिएंट 12GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 2,399 RMB (जवळपास 27,600 रुपये) आणि टॉप अँड हायएन्ड वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 2,699 RMB (जवळपास 31,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे.
हे देखील वाचा : Realme नंतर या चायनीज कंपनीने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, Xiaomi ला घरात मिळत आहे चांगलीच टक्कर
Redmi K40 Game Enhanced Edition : स्पेसिफिकेशन्स
Redmi K40 Game Enhanced Edition स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, टच सॅप्लिंग रेट 480Hz आहे. हा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येतो. तसेच डिस्प्लेच्या तिन्ही बाजूंना 1.8mm चा बेजल देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आली आहे. रेडमीच्या या गेमिंग स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC आहे जो 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेजसह येतो. या फोनची स्टोरेज microSD कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. Redmi K40 स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12 वर चालतो. Redmi च्या गेमिंग फोनमध्ये 5,065mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 67W वायर्ड फास्ट चार्जला सपोर्ट करते.
हे देखील वाचा : हि चायनीज कंपनी घेऊन येत आहे 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन, टाकेल का Samsung ला मागे?
कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi K40 Game Enhanced Edition मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत 8MP वाइड अँगल लेंस आणि 2MP ची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. रेडमीच्या या स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.1, GPS, आणि USB Type-C देण्यात आला आहे.
