Xiaomi ने गेल्या महिन्यात चीनमध्ये Redmi K40 Gaming Enhanced Edition स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा कंपनीचा पहिला गेमिंग स्मार्टफोन आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनबाबत समोर येत असलेल्या रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे कि हा फोन भारतात POCO ब्रँडिंगसह सादर केला जाऊ शकतो. प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मानुसार शाओमीचा या स्मार्टफोनला Bureau of Indian Standards (BIS) सर्टिफिकेशन मिळाले आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये असा दावा केला आहे कि शाओमीचा हा गेमिंग स्मार्टफोन POCO च्या ब्रँडिंगसह सादर केला जाऊ शकतो. (Xiaomi Redmi K40 Gaming Enhanced Edition gets BIS certification in India may launch soon with Poco branding)
The Redmi K40 Gaming (supposed POCO phone) battery has already been certified by the Indian BIS.#Xiaomi #Redmi #RedmiK40Gaming #POCOF3GT pic.twitter.com/WylfIH17xC
— Mukul Sharma (@stufflistings) May 11, 2021
Xiaomi ने याआधी पण अनेक रेडमी ब्रँडचे स्मार्टफोन भारतीय बाजारात POCO ब्रँडसह सादर केले आहेत. आता कंपनी चीनमध्ये लॉन्च झालेला Redmi K40 Gaming Enhanced Edition स्मार्टफोन भारतात पोको ब्रँडिंगसह सादर करू शकते. सध्या कंपनीने या स्मार्टफोनच्या इंडियन स्मार्टफोन मार्केटमधील लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
हे देखील वाचा : Realme-Redmi ला टक्कर देण्यासाठी आला 7 इंचाचा डिस्प्ले आणि 6,000mAh बॅटरी असलेला भारतीय स्मार्टफोन, किंमत फक्त 7799 रुपये
Redmi K40 Gaming Edition स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनमध्ये 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजोल्यूशन Full HD+, रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंपिलिंग रेट 480Hz आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 1200 चिपसेटसह सादर केला गेला आहे जो 12GB पर्यंत RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह लॉन्च केला गेला आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये 5,065mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी ऑफर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : लो बजेटमध्ये आला Realme C20A, 5000mAh बॅटरी असलेल्या या स्वस्त फोनची किंमत आहे 7,000 रुपयांच्या आसपास
कॅमेरा डिपार्टमेंट पाहता Redmi K40 Gaming Edition स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात प्राइमेरी कॅमेरा 64MP चा आहे, सोबत 8MP चा अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा, 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर चालतो. या फोनमध्ये युजर्स जबरदस्त गेमिंग एक्सपीरियंस मिळण्यासाठी Game Mode देण्यात आला आहे.
