Redmi Note 10 सीरीज मार्च मध्ये होईल भारतात लाॅन्च, 10 तारखेला होऊ शकते एंट्री

Redmi Note 9T

91मोबाईल्सने नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये सांगितले होते कि टेक कंपनी Xiaomi भारतात आपल्या ‘नोट’ डिवायसेजच्या विस्ताराची योजना बनवत आहे आणि याअंतर्गत रेडमी नोट 10 सीरीज लाॅन्च केली जाईल. आज या बातमीवर शिक्कामोर्तब करत कंपनीने स्वतः Redmi Note 10 सीरीजच्या भारतीय लाॅन्चची घोषणा केली आहे. पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये रेडमी नोट 10 सीरीज भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Xiaomi इंडिया हेड मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून अधिकृतपणे सांगितले आहे कि कंपनी भारतात रेडमी नोट 10 सीरीज लाॅन्च करणार आहे. हि घोषणा आज म्हणजे 10 फेब्रुवारीला करण्यात आली आहे. कंपनीने आतापर्यंत सीरीजच्या लाॅन्चची तारीख सांगितली नाही पण आशा आहे कि रेडमी नोट 10 सीरीज 10 मार्चला भारतात लाॅन्च होऊ शकते तसेच या सिरीज मध्ये Redmi Note 10 आणि Redmi Note 10 Pro स्मार्टफोन येऊ शकतात.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या लीकनुसार Redmi Note 10 मध्ये 120 हर्ट्ज असलेला एलसीडी डिस्प्ले असू शकतो. तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, फोटोग्राफीसाठी फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वाड कॅमेरा सेटअप असू शकतो. तसेच, पावर बॅकअपसाठी 5050mAh बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : Samsung चा मास्टरस्ट्रोक, लाॅन्च केला कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन Samsung Galaxy A32, प्रत्येक आहे स्पेसिफिकेशन दमदार

अलीकडे एक रिपोर्ट समोर आला होता कि रेडमी नोट 10 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 64 जीबी इनबिल्ट स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. तर रेडमी नोट 10 प्रो मध्ये 6 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज दिली जाऊ शकते.

कलर ऑप्शन पाहता Note 10 Pro Bronze, Blue आणि Gray कलर मध्ये लॉन्च केला जाईल. आतापर्यंत फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही लीक माहिती आली नाही. पण, सांगण्यात आले होते कि Redmi Note 10 आणि Note 10 Pro ची किंमत भारतात खूप आक्रमक असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here