इंंडियन टेक बाजारात प्रथम स्थानावर असलेली शाओमी आता देशात आपला नवीन सब ब्रांड घेऊन येणार आहे. शाओमीने याची घोषणा आधीच केली आहे की कंपनी देशात आपला सब-ब्रांड पोको इंडिया नावाने सुरू करेल आणि या ब्रांड अंतर्गत लॉन्च होणारा पहिला असेल स्मार्टफोन पोको एफ1. आज शाओमी च्या या सब-ब्रांड पोको इंडिया ने पहिला स्मार्टफोन पोको एफ1 ची लॉन्च डेट समोर आणली आहे. पोको इंडिया ने सांगितले आहे की कंपनी येत्या 22 ऑगस्टला देशात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
पोको इंडिया ने आपल्या आॅफिशियल ट्वीटर हँडल वरून पोको एफ1 च्या लॉन्च ची माहिती दिली आहे. पोको इंडिया ने ट्वीट करून सांगितले आहे की कंपनी येत्या 22 ऑगस्टला देशात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे. या ईवेंट चे आयोजन राजधानी दिल्ली मध्ये होईल आणि ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपला नवीन स्मार्टफोन पोको एफ1 लॉन्च करेल. पोको इंडिया ने या ईवेंट पोस्ट मध्ये पोको एफ1 ला ‘मास्टर आॅफ स्पीड’ म्हणून संबोधले आहे. पोको एफ1 ची सर्वात मोठी खासियत ही आहे की हा शाओमी च्या सब-ब्रांड पोको इंडिया अंतर्गत भारतात येणार आहे.
पोको एफ1 चे स्पेसिफिकेशन्स पाहता लीक्स नुसार हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे तसेच यात 416पीपीआई सपोर्ट वाला 5.99-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. शाओमी च्या सब-ब्रांड चा हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9 वर बनलेला आहे. सोबतच हा 2.8गीगाहर्ट्ज स्पीड वाल्या प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 630 जीपीयू असेल.
शाओमी पोको एफ1 6जीबी रॅम सह सादर केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज असू शकते. लीक नुसार फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात लिक्विड कूलिंग सिस्टम आहे. फोन मध्ये डुअल एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा असू शकतो. तर सेल्फी साठी या फोन मध्ये एलईडी फ्लॅश सोबत 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
लीक नुसार फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट, 4जी वोएलटीई, रियर फिंगरप्रिंट सेंसर व फेस अनलॉक फीचर असतील तसेच पावर बॅकअप साठी यात यूएसबी टाइप सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नोलॉजी वाली 4,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. पण शाओमी च्या सब-ब्रांड पोको इंडियाच्या पहिल्या स्मार्टफोन च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीसाठी 22 ऑगस्ट ची वाट बघावी लागेल.