नाण्यापेक्षा पण कमी जाड असेल Mi TV 5, लाइव फोटोज झाले लीक

शाओमी 5 नोव्हेंबरला चीन मध्ये एका इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंट मध्ये कंपनी आपले नवीन डिवाइसेज लॉन्च करू शकते. कंपनीने या इवेंट मध्ये लॉन्च केल्या जाणाऱ्या एकाही डिवाइसचा उल्लेख केला नाही. असे बोलले जात आहे कि कंपनी या इवेंट मध्ये Mi CC9 Pro स्मार्टफोन सोबत Mi TV 5 स्मार्ट टीव्ही सादर करेल.

लॉन्चच्या आधी Mi CC9 Pro चे अनेक लीक समोर आले आहेत. तर आता शाओमीने नवीन Mi TV 5 चे ऑफिशल रेंडर्स आधीच टीज केले आहेत. या रेंडर्स वरून टीव्हीच्या लुकचा अंदाजा लावता येईल. तसेच कंपनीने पण अधिकृतपणे हा टीव्ही लीक करायला सुरवात केली आहे.

रेंडर्स बद्दल बोलायचे तर यात Mi TV 5 मध्ये बाजूला ‘Designed by Xiaomi’ ब्रॅण्डिंग दिसत आहे. अजूनतरी अशी ब्रॅण्डिंग इतर शाओमी स्मार्ट टीव्ही वर दिसली नव्हती. टीजर मध्ये टीव्हीचे बारीक बेजल्स दिसत आहेत. तसेच यात हाई स्क्रीन-टू-बॉडी रेशियो मिळत आहे.

शेयर करण्यात आलेल्या नवीन लीक्ड फोटोज मध्ये हा स्मार्ट टीव्ही खूप बारीक असेल असे दिसत आहे. तसेच बेजल्स पण खूप बारीक असतील. तसेच या स्मार्ट टीव्हीची फ्रेम मेटलने बनलेली असू शकतो. बोलले जात आहे कि शाओमी हा टीव्ही प्रीमियम स्मार्ट टीव्ही म्हणून लॉन्च करू शकते.

विशेष म्हणजे Xiaomi ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कंपनी ब्रॅण्डच्या पहिल्या 108MP Penta Camera स्मार्टफोन वर वर काम करत आहे आणि हा Mi Note 10 नावाने 6 नोव्हेंबरला सादर केला जाईल. Xiaomi 14 नोव्हेंबरला पोलंडच्या आधी 6 नोव्हेंबरला स्पेनच्या मॅड्रिड शहरात एका इवेंटचे आयोजन करणार आहे. आणि कंपनीने अधिकृतपणे खुलासा केला कि या ईवेंटच्या मंचावरून म्हणजे 6 नोव्हेंबरलाच Mi Note 10 समोर येईल आणि जगातील पहिला 108MP Penta Camera स्मार्टफोन टेक विश्वासमोर सादर केला जाईल. स्पेन मध्ये हा लॉन्च ईवेंट 11:30 वाजता सुरु होईल जे भारतीय वेळेनुसार संध्याकाळचे 5 असतील.

विशेष म्हणजे कंपनी Mi CC9 Pro चीन मध्ये सादर करेल आणि याचा ग्लोबल वेरिएंट Mi Note 10 च्या नावाने सादर केला जाईल. कंपनीने यावेळी अशी कोणतीही माहिती दिली नाही. पण आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार दोन्ही फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here