Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी?

Xiaomi ने काल आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत ग्लोबली नवीन आणि पावरफुल फोन Mi 11 लॉन्च केला आहे. यासाठी कंपनीने एक वर्चुअल इवेंटचे आयोजन केले होते. हा फोन गेल्या वर्षी लॉन्च केल्या गेलेल्या मी 10 स्मार्टफोन्सचा अपग्रेडेड वर्जन आहे आणि जुन्या फोन्सच्या तुलनेत अनेक अपग्रेडेड फीचर्ससह आला आहे. हा स्मार्टफोन ग्लोबल लॉन्चच्या आधी गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च झाला आहे. फोनची खासियत पाहता हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 प्रोसेसरसह आला आहे. तसेच यात 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट व ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा 108-मेगापिक्सल आहे.

डिजाइन

लुकबद्दल बोलायचे झाले तर Mi 11 च्या फ्रंटला पंच-होल कट आउट देण्यात आला आहे जो डावीकडे वरच्या बाजूला आहे. तसेच फोनच्या तिन्ही कडा बेजललेस आहेत. फोन मध्ये राइट आणि लेफ्टची स्क्रीन कर्व्ड आहे. इतकेच नव्हे तर या डिस्प्ले मध्ये चारही बाजुंनी कर्व्ड कडा आहेत. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर बटन मिळतील. तर मागे कंपनीने ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे जो चौरस मॉड्यूल मध्ये आहे, ज्यात तीन कॅमेरा लेंससह एक एलईडी पण आहे.

ताकदवान प्रोसेसर

Mi 11 मध्ये क्वालकॉमचा Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. क्वालकॉमच्या बेंचमार्क रिजल्ट मध्ये या चिपसेटसह सीपीयू, ग्राफिक्स आणि AI समवेत इतर विभागांमध्ये चांगली परफॉर्मन्स दिसली आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये 25 टक्के पर्यंत वेगवान CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के पर्यंत जास्त वेगवान ग्राफिक्ससह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो.

हे देखील वाचा : Mi 11 Ultra लॉन्च करून Xiaomi करणार आहे धमाका, 120Hz डिस्प्लेसह यात असेल 67W वायरलेस चार्जिंग

पावरफुल कॅमेरा

Mi 11 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप चौरस मॉड्यूल मध्ये दिला आहे. यात अपर्चर f/1.85 सह 108MP प्राइमरी सेंसर, 13MP (f/2.4 aperture) अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि 5MP (f/2.4 aperture) टेलिफोटो कॅमेरा लेंस आहे. त्याचबरोबर फोन मध्ये MEMC व्हिडीओ फ्रेम टेक्नोलॉजी, OIS, रियल-टाइम SDR टू HDR आणि व्हिडीओ सूपर-रिजोल्यूशनला सपोर्ट आहे. सेल्फी कॅमेरा पाहता फ्रंटला 20MP चा कॅमेरा मिळतो.

डिस्प्ले

Mi 11 मध्ये 1500 nits ब्राइटनेस, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.81-इंचाचा 2K WQHD (1,440×3,200 पिक्सल) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले मध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल डिजाइन आहे. शाओमीने या डिस्प्ले मध्ये HDR10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन दिले आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ची मोठी कामगिरी, आता हवेतून होईल स्मार्टफोन चार्ज, आली नवीन टेक्नॉलजी

कनेक्टिविटी फीचर्स आणि बॅटरी

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,600mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती Mi TurboCharge 55W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. त्याचबरोबर हा फोन 10W वायरलेस रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. Mi 11 मध्ये बिल्ट-इन हार्ट रेट सेंसरसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये NFC आणि Wi-Fi 6E सपोर्ट पण आहे आणि हा फोन दोन ब्लूटूथ हेडसेट्सशी एकसाथ कनेक्ट केला जाऊ शकतो.

किंमत

Mi 11 च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत यूरोप मध्ये EUR 749 (जवळपास 65,732 रुपये) पासून सुरु होईल. तर फोनच्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत EUR 799 (जवळपास 70,120 रुपये) असेल.

शाओमी मी 11 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here