Govinda Naam Mera: कसलेल्या मराठी कलाकारांसह येतोय भन्नाट कॉमेडी चित्रपट; थेट OTT वर होणार रिलीज

कॉमेडी चित्रपटांच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे. लवकरच अभिनेता Vicky Kaushal चा Govinda Naam Mera चित्रपट थेट Disney+Hotstar OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. Govinda Naam Mera Movie मध्ये विक्कीसह Kiara Advani आणि Bhumi Pednekar यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत, तसेच सहकलाकारांच्या यादीत मराठी कलाकारांचा भरणा आहे. या चित्रपटात जबरदस्त कॉमेडी आणि हटके गोष्ट असेल, असं सांगण्यात आलं आहे. हा चित्रपट करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शननं बनवला आहे, तसेच याचे दिग्दर्शन Shashank Khaitan यांनी केलं आहे. चला जाणून घेऊया या चित्रपटाविषयी संपूर्ण माहिती तसेच रिलीज डेट.

16 डिसेंबरला येतोय ‘गोविंदा नाम मेरा’

‘गोविंदा नाव मेरा’ चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Karan Johar नं चित्रपटाचा पोस्टर शेयर करून दिली आहे. करण जौहरनं आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की “या चित्रपटाचा प्लॉट तुमची उत्सुकता जास्त वाढवेल. तयार व्हा कारण काही मसालेदार इंटरटेनमेंट थेट तुमच्या होम स्क्रीनवर येणार आहे. हा चित्रपट डिज्नी प्लस स्टारवर 16 डिसेंबरला रिलीज होत आहे. जर तुम्हाला देखील कॉमेडी आणि एंटरटेनमेंटनं रिफ्रेश व्हायचं असेल तर हा चित्रपट नक्की बघू शकता.” हे देखील वाचा: [Exclusive] Realme 10 सीरिजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट्स येणार भारतात; किंमत झाली लीक

चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या विकी कौशलनं देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचा पोस्टर शेयर केला आहे. त्याने चित्रपटाची रिलीज डेट आणि अन्य माहिती शेयर केली आहे. त्याने पोस्टमध्ये लिहलं आहे की “गोविंदा नाम मेरा, नाचना काम मेरा आ रहा हूं जल्द अपनी कहानी लेकर.”

चित्रपटात विकी कौशलसह दिसणाऱ्या अभिनेत्री कियारा आडवाणीनं देखील पोस्ट शेयर केली आहे. कियारा खूप क्रेजी अंदाजात दिसत आहे, म्हणजे तिची भूमिका खूप की उनका किरदार खूप ईश्कबाज असेल. तसेच या चित्रपटात ‘दम लगा के हैशा’ फेम भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत दिसेल, तिने देखील आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये चित्रपटाच्या रिलीज डेटची माहिती दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये ती खूप बोल्ड अंदाजात दिसत आहे. पोस्टरनुसार या चित्रपटात गोविंदाच्या हॉट वाइफची भूमिका भूमी साकारताना दिसेल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत आला OnePlus Nord N20 SE; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह भारतीयांच्या भेटीला

कसलेले मराठी कलाकार देखील चित्रपटात

विकी कौशलच्या आगामी कॉमेडी चित्रपटात सहायक कलाकारांच्या यादीत अनेक मराठी कलाकार देखील आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरनुसार ‘गोविंदा नाम मेरा’ मध्ये आपल्या अभिनयासाठी ओळखले जाणारे मराठी मराठी कलाकार दिसत आहेत. या मराठी कलाकारांच्या यादीत रेणुका शहाणे, अमेय वाघ, सयाजी शिंदे, तृप्ती खामकर यांचा समावेश आहे. तीनही कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here