एकही रुपयांना न देता मिळवा 48जीबी डेटा मोफत; बीएसएनएल नव्हे तर ‘या’ कंपनीनं केली कमाल

Vodafone idea आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता फ्री डेटा ऑफर करत आहे. कंपनी हा फ्री डेटा फक्त दोनच रिचार्ज प्लॅनवर देत आहे, ज्यांची किंमत 901 रुपये व 601 रुपये आहे. या दोन्ही रिचार्जमध्ये 48जीबी पर्यंत डेटा मिळत आहे. विशेष म्हणजे फ्री मिळणाऱ्या डेटाबद्दल कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु, वेबसाइटवर प्लॅनसह वेगळा अतिरिक्त डेटा मिळत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच दोन्ही प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग, एसएमएस आणि अनेक बेनिफिट्सचा लाभ देखील युजर्सना मिळेल. पुढे तुम्हाला दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्ससह अ‍ॅडिशनल डेटाची संपूर्ण माहिती दिली आहे.

Vi 601 रुपयांचा रिचार्ज

वोडाफोन आयडियाच्या 601 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन बाबत बोलायचे झाले तर ग्राहकांना यात 3GB डेटा डेली दिला जात आहे. तसेच कोणत्याही नेटवर्क फ्री अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देखील घेता येईल आणि रोज 100 एसएमएस मोफत पाठवता येतील. 601 रुपयांच्या या वोडाफोन आयडियाच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. हे देखील वाचा: 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह शानदार इलेक्ट्रिक स्कूटर; चार्जींगविना धावते 180 किलोमीटर

या प्लॅनमध्ये फक्त इतकेच बेनिफिट्स नाहीत तर अ‍ॅडिशनल बेनिफिट्स म्हणून या रिचार्जमध्ये 1 वर्षांचे Disney+ Hotstar Mobile subscription देखील मिळत आहे. रोजच्या 3GB डेटासह कंपनी 16GB EXTRA Data देखील देत आहे. तसेच Binge All Night हे कंपनीचं खास फिचर देखील या प्लॅनमध्ये आहे, ज्यात ग्राहक मध्यरात्री 12 पासून सकाळी 6 पर्यंत जो डेटा वापरतील तो डेली कोट्यामधून कट होणार नाही. तसेच Weekend data rollover च्या मदतीनं सोमवार ते शुक्रवार या काळात उरलेला डेटा शनिवार आणि रविवारी वापरता येईल. तर Data delights मध्ये युजर्सना दर महिन्याला 2GB बॅकअप डेटा देखील दिला जातो.

Vi 901 रुपयांचा रिचार्ज

वोडाफोन आयडिया युजर्ससाठी असलेल्या 901 रुपयांचा प्लॅनमध्ये रिचार्जमध्ये देखील ग्राहकांना डेली 3GB डेटा दिला जात आहे, परंतु या प्लॅनची वैधता 70 दिवस आहे. तसेच ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर अमर्याद कॉल करू शकतात कारण हा प्लॅन फ्री अनलिमिटेड कॉलिंगला सपोर्ट करतो. कंपनी रोज डेली 100 एसएमएस देखील मोफत देत आहे. हे देखील वाचा: अरारारा खतरनाक! 6000mAh ची राक्षसी बॅटरीसह Infinix Hot 20 Play लाँच; किंमत सर्वाना परवडणारी

901 रुपयांच्या वोडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये कंपनी ओटीटी बेनिफिट्स देत आहे. अ‍ॅडिशनल बेनिफिट्स म्हणून या रिचार्जमध्ये 1 वर्षाचे Disney+ Hotstar Mobile subscription दिलं जात आहे. डेली डेटा वगळता ग्राहकांना 48GB EXTRA Data मोफत मिळतो. तसेच Binge All Night च्या मदतीनं रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान मोफत इंटरनेट वापरता येतं. Weekend data rollover च्या मदतीनं वीकडेज मधील उरलेला डेटा वापरून विकेंड आनंदात घालवता येईल. तर Data delights मध्ये 2GB बॅकअप डेटा क्लेम करता येईल.

नोट: या दोन्ही प्लॅनमध्ये फ्री मिळणारा डेटा कधीपर्यंत असेल याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here