Samsung Black Friday: अत्यंत स्वस्तात मिळतायत आयफोनला टक्कर देणारे Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3, अशी आहे ऑफर

सॅमसंग ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान धमाकेदार ऑफर सादर केली. सेल अंतर्गत सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. Black Friday सेल दरम्यान सॅमसंगचा फ्लॅगशिप – Galaxy S22 Plus स्मार्टफोन आणि फ्लिप स्मार्टफोन Galaxy Z Flip 3 फक्त 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सॅमसंगचे हे दोन्ही स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्स आणि शानदार डिजाइनसह येतात. चला जाणून घेऊया सॅमसंग ब्लॅक फ्रायडे सेल दरम्यान Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफरची सविस्तर माहिती.

सॅमसंग Black Friday सेल

सॅमसंगच्या Black Friday सेल दरम्यान Galaxy S22 Plus आणि Galaxy Z Flip 3 स्मार्टफोन फक्त 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. सॅमसंगच्या या दोन्ही स्मार्टफोनची एमआरपी 84,999 रुपये आहे. तसेच सॅमसंग जुन्या स्मार्टफोनवरून अपग्रेड केल्यावर 10000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे.

सॅमसंगचे हे दोन्ही फोन सर्व डिस्काउंटनंतर 59,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. सॅमसंगची ही ऑफर फक्त ऑफलाइन स्टोरवर उपलब्ध आहे. या ऑफरचा फायदा सॅमसंगच्या ऑफलाइन स्टोरवरून 28 डिसेंबरपर्यंत घेता येईल. हे देखील वाचा: OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज

Galaxy S22 Plus स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy S22 Plus स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Dynamic AMOLED 2K डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 1 चिपसेटची ताकद मिळते. तसेच फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP + 12MP + 10MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 10MP चा कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 45W फास्ट चार्जचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Galaxy Z Flip 3 स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Z Flip 3 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. तसेच फोनमध्ये 1.9-इंचाचा Super AMOLED सेकंडरी डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. प्रायमरी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि सेकंडरी डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आणि Android 11 चा सपोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 3,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 12MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाइड लेन्स देण्यात आली आहे. Galaxy Flip 3 मध्ये 10MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. हे देखील वाचा: VIDEO: MS Dhoni नं खरेदी केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार; फीचर्स ऐकून तुम्ही देखील व्हाल फॅन

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here