24,680 नवीन गावांना मिळणार BSNL ची 4G Services; नवीन मोबाईल टॉवर उभारणार, 1.64 लाख कोटीच्या पॅकेजची घोषणा

भारतात सध्या 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरु आहे ज्यात खाजगी कंपन्या सहभागी होत आहेत. परंतु सरकारी कंपनी बीएसएनलची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. आता केंद्र सरकारनं BSNL 4G Services संबंधित अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे नक्कीच बीएसएनएलचे ‘अच्छे दिन’ येतील. केंद्रीय कॅबिनेटनं बीएसएनएल कंपनीसाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजूरी दिली आहे ज्याचा वापर कंपनी आपलं नेटवर्क आणि सर्व्हिस सुधारण्यासाठी करणार आहे. नवीन प्लॅनिंग अंतगर्त आता 24,680 गावांमध्ये BSNL 4G Services सुरु केली जाईल तसेच देशभरात 19,722 नवीन Mobile Tower उभारण्यात येतील. केंद्र सरकारनं Bharat Sanchar Nigam Limited (BSNL) आणि Bharat Broadband Network (BBNL) च्या विलीनीकरणाला देखील मंजूरी दिली आहे.

BSNL 4G Services

5G in India चं लवकरच सत्यात येणार आहे. एकीकडे Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या 5G Services लाँच करण्याची तयारी करत आहेत, तर दुसरीकडे देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलला अजूनही संपूर्ण देशात आपलं 4G Network देखील सुरु करता आलं नाही. संसाधनांच्या अभावात असलेल्या बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी काल केंद्रीय कॅबिनेटनं अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार BSNL ला मोठी आर्थिक मदार दिली जाईल, तसेच कंपनी देशात नवीन मोबाईल टॉवर उभारून दुर्गम भागात आपली 4G Services सुरु करेल.

दूरसंचार मंत्री अश्वनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, कॅबिनेटच्या निर्णयानंतर आता देशातील 24,680 गावांमध्ये BSNL 4G Services देण्यात येईल. या भागांमध्ये 4जी सर्व्हिस देण्यासाठी कंपनीला 26,316 कोटी रुपयांच्या पॅकेजची मंजूरी देण्यात आली आहे. फक्त इतकेच नव्हे तर 6,279 अशा गावांची निवड करण्यात आली आहे जिथे सध्या 2G आणि 3G सर्व्हिसच उपलब्ध आहे, या गावांमधील नेटवर्क आता 4जी वर अपग्रेड करण्यात येईल. मिळालेल्या माहितीनुसार देशात 4जी सेवा चालू करण्यासाठी तसेच सर्व्हिस सुधारण्यासाठी बीएसएनएल 19,722 नवीन मोबाईल टॉवर देखील उभारेल.

1.50 लाख कोटींची मदत

संपूर्ण भारतात BSNL 4G Services देण्यासाठी केंद्र सरकारनं कंपनीला खूप मोठं पॅकेज देखील दिलं आहे. 4G सर्व्हिससाठी आवश्यक उपकरणं लावण्यासाठी आणि टेक्नॉलॉजीी अपग्रेड करण्यासाठी सरकारकडून बीएसएनएलला 26 हजार कोटी रुपयांची रक्कम दिली जाईल. तसेच दुर्गम भागांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्ये व्हायरलाइन सर्व्हिस देण्याचे प्रकल्प देखील हातात घेतले जातील यासाठी बीएसएनएलला 13,789 कोटी रुपये इक्विटी म्हणून देण्यात येतील. केंद्राकडून मिळालेल्या या मुदतीनंतर बीएसएनएलचा इक्विटी बेस 40,000 कोटींवरून 1,50,000 कोटी होईल.

BSNL चा 5G स्पेक्ट्रम ऑक्शनमध्ये सहभाग

5G स्पेक्ट्रमचा लिलाव या महिन्यात होणार आहे, परंतु यात फक्त प्रायव्हेट टेलीकॉम प्लेयर्स सहभागी होत आहेत. यात प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांमध्ये Reliance Jio, Airtel, Vodafone Idea सोबतच Adani Group चा देखील समावेश आहे. परंतु BSNL 5G स्पेक्ट्रममध्ये सहभागी होणार नाही. कारण ही एक सरकारी कंपनी आहे आणि जर कंपनीनं 5जी सेवा आणली तर भारत सरकारद्वारे बीएसएनएलसाठी वेगळा स्पेक्ट्रम रिजर्व्ह ठेवण्यात आला असता. काही दिवसांपूर्वी रिपोर्ट्स समोर आले होते की BSNL नं 3300 MHz ते 3670 MHz बँड मध्ये 70MHz च्या एयरवेव्ससाठी 5G लायसन्सची मागणी केली होती. परंतु आतापर्यंत यावर सरकारकडून कोणतंही उत्तर आलं नाही. काही दिवसांपूर्वी एक बातमी मात्र आली होती की, 15 ऑगस्टला बीएसएनएल 5जी चा देखील रस्ता मोकळा होईल.

वर सांगितल्याप्रमाणे BSNL ऑक्शनमध्ये भाग घेणार नाही परंतु बातमी अशी आहे की कंपनी लिलावात ठरलेली किंमत देईल जेणेकरून जेव्हा त्यांना मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करून 5G सर्व्हिस लाँच करायची असेल तेव्हा करता येईल. तसेच, BSNL 4G सर्व्हिस बिल्ट-इन 5G क्षमतेसह सादर करेल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here